वेध जागतिक अग्रमानांकनाच ‘सिद्धी असोसिएटस’... एक ध्येयवेडे विमा प्रतिनिधी

विमा क्षेत्रात जागतिक पातळीवर आजपर्यंत कुठल्याही विमा प्रतिनिधीने विचार केला नसेल, असा माईलस्टोन सेट करण्याचा मानस वा स्वप्न ‘सिद्धी असोसिएट्स’च्या डॉ. मिलिंद संपगावकर या ध्येयवेड्या प्रतिनिधीने बाळगले आहे. हे ध्येय गाठणे खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांनादेखील अवघड असते.

डॉ. संपगावकर हे एका वर्षाच्या कालावधीत एक लाख एकाव्वन्न हजार (१,५१,०००) विमा पॉलिसी विकून जागतिक पातळीवर देशाचेनाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. ही डॉ. संपगावकर यांची अजून एक नावीन्यपूर्ण संकल्पना असून, फक्त विमा प्रतिनिधीच नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणारा समाजसेवक ही ओळख करून देतात. त्यांनी स्वप्न बाळगलेल्या एक लाख एक्कावन्न हजार विमा पॉलिसीमुळे एक लाख एकाव्वन्न हजार घरांना सुरक्षित करण्याबरोबरच, डॉ. संपगावकर यांनीच स्थापन केलेल्या ‘मध्यमवर्गीय विकास मंचा’ला वरील एक लाख एकाव्वन्न हजार लोकांच्या पॉलिसीतून येणाऱ्या उत्पन्नातील अर्धे उत्पन्न (५० टक्के उत्पन्न) मदत म्हणून वापरण्याचा त्यांचा मानस आहे. डॉ. संपगावकर म्हणाले, की संपूर्ण जगात इतक्या मोठ्या प्रमाणात विमा पॉलिसी एका आर्थिक वर्षात विकण्याचा विचार एका विमा प्रतिनिधीने करणे हे एक मोठे आव्हानच आहे. असा विचार एक प्रतिनिधी सोडाच, पण खासगी क्षेत्रातील विमा कंपनीनेदेखील केलेला नसेल. परंतु मी हा विचार केला आहे. १३२ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, मी दीड लाख परिवारांना विमा पॉलिसीद्वारे संरक्षित करू शकलो नाही तर माझा विमा प्रतिनिधी असण्याचा समाजाला काय फायदा? तसेच या संकल्पित संख्येच्या विमा पॉलिसी विकून मला स्वतःचा आर्थिक फायदा करवून घ्यायचा, नसून ‘मध्यमवर्गीय विकास मंचा’च्या माध्यमातून मध्यमवर्गीय कुटुंबांना शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य, औषधेयांची मदत पोचविणे हे माझे उद्दिष्ट आहे. या चांगल्या कामात कोणीही कमीत कमी रुपये ३००/- प्रतिमाह पासून सुरू होणारी विमा पॉलिसी ‘सिद्धी असोसिएट्स’कडे करून ‘मध्यमवर्गीय विकास मंचा’च्या कामात व जागतिक स्तरावर अशक्यप्राय वाटणाऱ्या माझ्यासारख्या ध्येयवेड्या व सर्वसामान्य कुटुंबातील मुलास आपण हातभार लावावा, अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. यासाठी ८८९८८९३९३९ / ९०४९४६४०८७ यांपैकी कोणत्याही क्रमांकाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘नमस्कार’ असा मेसेज करावा.

यासाठी डॉ. संपगावकर यांनी केलेली तयारीदेखील वाखाणण्यासारखी आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या कंपन्यांशी चर्चा करून ऑनलाइन पॉलिसी विकण्याचे मॉडेलदेखील उभे केले आहे. व्हॉट्सॲपवर मेसेज केल्यानंतर मेसेज करणाऱ्याला एक लिंक पाठविली जाते, त्या लिंकवर आपण आपली माहिती भरून संबंधित विमा कंपनीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतला जातो. त्यानंतर डिजिटल सही व डिजिटल कागदपत्रांची पडताळणी केली जाते. या प्रणालीनंतर ऑनलाइन पेमेंटची लिंक आपल्या ई-मेलवर पाठवून ऑनलाइन पेमेंटची सुविधा केलेली आहे. सदर पॉलिसी संबंधित कंपनीकडून पूर्ण केली जाते. या विषयाच्या अधिक माहितीकरिता आपण ‘सिद्धी असोसिएट्स’ला संपर्क करू शकता.

एक साध्या दुकानाचे जसे मॉलमध्ये रूपांतर झाले, त्याप्रमाणे गुंतवणूक क्षेत्रामध्ये ‘सिद्धी असोसिएट्स’ नावाने एक मोठा ‘फायनान्शिअल मॉल’ उभा करणारा व भारतातले पहिले मल्टिस्पेशॅलिटी ‘फायनान्शिअल हब’ उभे करणारा डॉ. संपगावकर हा एक अवलिया. केवळ गुंतवणूक अथवा विमा प्रतिनिधी नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणारा विमा प्रतिनिधी आहे. यासोबतच ते ३८ सहकारी बँका व ४०० हून अधिक पतसंस्थांना सल्लागार म्हणून कार्यरत असणारे आर्थिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. स्वयंशिस्त व उच्च शैक्षणिक पात्रता या जोरावर ‘सिद्धी असोसिएट्स’ने २०१२ ला एका ग्राहकावरून सुरवात करून, २०,८०० ग्राहकांपर्यंतचा टप्पा गाठला आहे.

डॉ. संपगावकर यांनी २०१२ ला एका खासगी विमा क्षेत्रातील कंपनीच्या उच्च पदाचा राजीनामा देत व्यवसायात पदार्पण केले. हळूहळू ‘सिद्धी असोसिएट्स’चा आलेख सतत उंचावला जाऊ लागला. केवळ पुण्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेरदेखील ग्राहकांची संख्या वाढली. हे डॉ. संपगावकर यांनी स्वतः लक्षपूर्वक सर्व ग्राहकांना सेवासुविधा पुरविण्याचे फलित आहे. त्यांचे ग्राहक महाराष्ट्र राज्यापुरतेच मर्यादित नसून गुजरात, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या सारख्या राज्यात देखील आहेत. व्यवसायाची भौगोलिक व्याप्ती वाढली, त्याच अनुषांगाने २०,८०० ग्राहकांची व्याप्ती व वर्गवारीदेखील आकर्षक आहे. सर्वसामान्य घरातील व्यक्तीपासून मोठे उद्योजक, दिग्दर्शक, मराठी अथवा हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार, जागतिक दर्जाचे क्रिकेट विश्वातील खेळाडू, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, सरकारी व निमसरकारी कर्मचारी, अधिकारी, राजकीय व्यक्तिमत्त्व अशा विविध क्षेत्रातील ग्राहकांना आर्थिक सुविधा पुरविण्यात ‘सिद्धी असोसिएट्स’ यशस्वी झाली आहे. ‘केवळ उत्कृष्ट व वेळेत सेवा देत राहायची व्यवसाय आपोआपच वाढत जातो’, या तत्त्वाने विमा व गुंतवणूक क्षेत्रात योग्य सल्ला देत मागील नऊ वर्षांत सर्व ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करून ‘सिद्धी असोसिएट्स’ कार्यरत आहे. डॉ. संपगावकर विश्वासाने सांगतात, की माझी विमा कंपनीने विमा विषयाचा प्रसार व प्रचार करण्याकरिता नेमणूक केली आहे, म्हणून मी फक्त विमा या विषयाचा प्रसार व प्रचार करण्याचे काम करीत आहे. त्या संदर्भातीलच सेवा मी माझ्या ग्राहकांना देतो. यामुळे माझ्या व्यवसायाचा परीघ हा बघता-बघता वाढतच चालला आहे. आम्ही अभिमानाने सांगतो, आमच्याकडे एक व्यक्ती ग्राहक म्हणून आली, तर ती व्यक्ती न सांगता आमचेनाव त्यांच्या स्नेहीजनांना निश्चितच सांगते. एक संतुष्ट ग्राहक ‘सिद्धी असोसिएट्स’चा प्रचार करतो. पुढचा त्याच्याच स्नेहीला हा प्रसार करतो. यामुळे एका ग्राहकाने सुरवात केल्यावर ही ‘रेफरन्स चेन’ ५७ लोकांपर्यंत पोचलेली आहे.

सामाजिक ऋण फेडणारा गुंतवणूक सल्लागार

फक्त गुंतवणूकविषयक सल्ला अथवा विमा विकणे इतक्याच कक्षेत राहून व्यवसाय करण्यामध्ये ते कधीही गुंतून राहिले नाही. तर आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाच्या ऋणात राहून सेवा करण्याच्या उद्देशानेप्रेरित होऊन दरवर्षी नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सर्वसामान्य जनतेस मदत करणारा एक हळवा समाजसेवक देखील ते आहेत.

शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत

नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ या काळात शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या क्लेम सेटलमेंटसाठी डॉ. संपगावकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याची कागदपत्रे पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यात हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या विम्याबाबतच्या अडचणी सांगितल्या व जवळपास ९६ टक्के शेतकऱ्यांचे पीक विम्याबाबतचे विषय सोडवून त्यांना मदत केली.

‘मध्यमवर्गीय विकास मंचा’ची स्थापना

डॉ. मिलिंद संपगावकर यांनी सामाजिक कार्य करीत असताना अनेक गरजूंना अनेक प्रकारच्या मदत केल्याचे सर्वश्रुत आहेच. विशेष म्हणजे मदत करीत असताना कोणत्याही प्रकारचे फोटो काढले जात नाहीत किंवा त्या फोटोंसह सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली जात नाही. ते म्हणतात, की योग्य ठिकाणी, योग्य वेळी मदत पोचविणे महत्त्वाचे असते. तसेच मदत अथवा दान हे नेहमी सत्पात्री असावे. हेच लक्षात घेऊन ‘मध्यमवर्गीय विकास मंचा’ची स्थापना करण्यात आली. डॉ. संपगांवकरांच्या अनुभवानुसार मध्यमवर्गीय कुटुंब अडचणींच्या काळातदेखील एखाद्या ठिकाणी उभे राहून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत अथवा मदतीसाठी याचना करीत नाहीत. कारण ज्या ठिकाणी फोटो व नावेवापरून मदत केली जाते, अशा ठिकाणी मध्यमवर्गीय माणूस अशा मदतीसाठी सहसा तयार होत नाही. हा मुद्दा लक्षात घेऊन डॉ. संपगावकर यांनी ‘मध्यमवर्गीय विकास मंचा’ची स्थापना केली. डॉक्टरांनी सांगितले, की समाजात कित्येक दानशूर मदत करण्यास तयार असतात. समाजातील अशा दानशूर व्यक्तींनी मध्यमवर्गीयांच्या मदतीसाठी पुढे यावे. मदत करताना हवे असल्यास माझ्यासोबत ‘मध्यमवर्गीय विकास मंचा’च्या नावासह फोटो काढावेत, व ते इच्छा असल्यास सोशल मीडिया अथवा वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करावेत. अशा आलेल्या मदतीस दानशूरांच्या समोरच गरज असलेल्या मध्यमवर्गीयांना दिले जाते. दानशूर व्यक्ती आम्हाला मदत केल्याबाबत उल्लेख करू शकते, परंतु त्या संबंधित मध्यमवर्गीय कुटुंबाचे नाव अथवा फोटो प्रसिद्ध करू शकणार नाही. ‘मध्यमवर्गीय विकास मंच’ हे कुणालाही दान करत नाही, तर मदत ही उसनेया स्वरूपात देतो. मागच्या वर्षी १२ ऑगस्ट २०२० या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही ११०० डझन वह्यांचेवाटप केले. पण हेवाटप हे मध्यमवर्गीयांच्या मुलांना केलेव त्यावर त्यांच्या पहिल्या पानावर आम्ही लिहून दिले, की या वह्यांचा वापर करून खूप शिका,खूप मोठे व्हा, खूप पैसे कमवा व पात्र झाल्यानंतर हे घेतलेले उसने तुमच्यासारख्याच एखाद्या मध्यमवर्गीय व गरजू कुटुंबातील मुलांना द्या. त्यांच्या शिक्षणाला मदत करा. यामुळे आपण घेतलेल्या मदतीची परतफेड होऊन आपणास समाधान मिळेल. गेल्या वर्षभरात कोविडच्या काळात, ज्या मध्यमवर्गीय कुटुंबांना अन्नधान्याकरिता मदत केली होती त्या कुटुंबांना सांगितले होते की मी तुम्हाला ही गोष्ट दान म्हणून दिलेली नसून उसने म्हणून देत आहोत. तुमची परिस्थिती असताना मात्र यथाशक्ती अशाप्रकारेच धान्य आपण ‘मध्यमवर्गीय विकास मंचा’च्या माध्यमातून अथवा परस्पर एखाद्या गरजू कुटुंबाला देऊन आपले ऋण फेडाल अशी अपेक्षा आहे. या संपूर्ण उपक्रमात मध्यमवर्गीय परिवाराचा कुठेही आत्मसन्मान दुखावला जाऊ नये, याची काळजी डॉ. संपगावकर व त्यांची टीम घेत असते.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत

म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीबाबत जनसामान्यांमध्ये अनेक प्रश्न असतात. अनेक संस्था फक्त गुंतवणूक करून सोडून देतात. त्यांना असेवाटते, की फंड मॅनेजर त्यांचे काम करत आहेत, आपण त्याच्यात काही करण्याची गरज नाही. पण याबाबत डॉ. संपगावकर यांचे मत वेगळे आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यांची ‘फॅक्ट शिट’ वेळोवेळी तपासली पाहिजे. फंड मॅनेजर कुठल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवितो हेदेखील गुंतवणूक सल्लागाराने बघितले पाहिजे. आम्ही याच धोरणाचा अभ्यास करून आमच्या ग्राहकांना याबाबतचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. स्विचिंग कधी करायचे, कसे करायचेयाबाबत मार्गदर्शन करून आम्ही ते करून देत असतो. दर महिन्याच्या ५ व २० तारखेला प्रत्येक ग्राहकाचे फंड रिपोर्ट्स काढून त्याचा अभ्यास करतो व ते फंड रिपोर्ट ग्राहकांना त्यांच्या मेलवर अथवा जे मेल पाहू शकत नाहीत त्यांना व्हाॅट्सअॅप किंवा फोनवर कळविल्यानंतर पुढील कारवाई केली जाते. ‘सिद्धी असोसिएट्स’ फक्त गुंतवणूक करत नाही तर आमच्या ग्राहकांना प्रशिक्षित करण्याचादेखील प्रयत्न करत असतो.

विमा प्रतिनिधी (एजंट) या संकल्पनेला भारतात ‘सिद्धी असोसिएट्स’च्या रूपात एका आगळ्या-वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवणारा एक तरुण युवा उद्योजक म्हणजे

डॉ. मिलिंद संपगावकर!

सामाजिक उपक्रम

डॉ. संपगावकर यांनी केलले्या मदतीची कधीही जाहीर वाच्यता केली नाही, अथवा फोटो प्रसिद्ध केलेनाहीत. त्यांनी केलले्या मदतीबाबत त्यांना आणि मदत घेणार्यालाच माहिती असते. त्याचा अशा सामाजिक बांधिलकी जपण्याच्या स्वभावामुळे त्यांना समाजात व त्यांच्या मित्रपरिवारात आदराचे स्थान आहे. करोनाच्या महामारीमुळे २०२० मध्ये जनता त्रस्त होती. अनेक दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत होत्या. या सर्वांची प्रसिद्धीदेखील होत होती. परंतु याच काळात डॉक्टरांनी गरजेनुसार खऱ्या गरजवंतांना मदत पोचविण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यांनी पहिल्याटप्प्यात अनेक सामाजिक संस्था, संघटना, एनजीओ गरीब लोकांना अन्नदान केले. त्यांना अर्थिक मदत करण्याचे कामही केले. कालांतराने काही गोशाळांना चारा तसचे अर्थिक मदतही केली. कोविडमुळे उद्भवलेल्या आणीबाणीसदृश काळात ठिकठिकाणी असलेल्या पोलिस तथा सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततसाठी फेसशिल्डचेवाटप केले. एवढेच नाही तर मे २०२१ मध्ये हिंगोली येथील पोलिस कर्मचाऱ्यांना व होमगाारस चौदाशे फेसशिल्डचे वाटपही केले. गरज असेल तिथे पीपीई कीट घालून रुग्णांना सकारात्मक विचार करायला लावण्याच कामही त्यांनी केले. यासाठी कोणत्याही प्रसिद्धीची गरज त्यांना वाटली नाही. कोविड काळामध्ये सर्व स्तरात मदत करीत असताना, डॉ. संपगावकरांना मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दुःखाची व अडचणीची जाणीव झाली. त्यांनी ज्यांना कुठल्याही संस्थेने अथवा यत्रं णेने मदत केली नाही अशा कुटुंबांना अन्नधान्याची व औषधोपचाराची मदत करायला सुरवात केली. जवळपास २७,००० हजार होमिओपॅथी औषधाच्या बाटल्यांचे वितरण घरपोच केले. त्यानतर गुढीपाडव्याला म्हणजेच 12 एप्रिल 2019 रोजी ‘मध्यमवर्गीय विकास मंचा’ची स्थापना केली.

डॉक्टरांच्या सर्व उपक्रमातील प्राधान्यक्रमाने गौरविलेले महत्त्वाचे तीन उपक्रम

  • पदवीधर युवक संघामार्फत युवकांना नोकरी, व्यवसायासाठी मार्गदर्शन केले.
  • आईच्या नावे ‘कै सौ. भारती भरत संपगावकर कॅन्सर चॅरिटेबल ट्रस्ट (बी.बी.एस. फाउंडेशन)’तर्फे आजपर्यंत पाच हजार महिलांच्या मॅमोग्राफी टेस्ट केल्या.
  • पुण्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रथमोपचार पेटींचे वाटप केले आहे.

शैक्षणिक पात्रता

M.Com, M.Phil, Fellow from Insurance Institute of India (III), PhD in Micro Insurance & Co. Op. Bank, CA Inter, GDCA, Certification of Public Policy Economic from Oxford University, M.S. in Insurance Management from Boston University.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनात विशेष प्रावीण

सेवानिवृत्त झालेल्या सरकारी, निमसरकारी किं वा खासगी क्त्षेरातील कर्मचाऱ्यांना त्यांची आयुष्यभर कमावलेली मिळकत कुठे गुंतवावी व आपले उर्वरित आयुष्य सुकर कसे होईल, हा सर्वांत मोठा प्रश्न असतो. परंतु योग्य सल्ला व सेवा देऊन या विषयात देखील डॉ. मिलिंद संपगावकर यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त के ले आहे. त्यांचे आतापर्यंतचे ग्राहक हे, डॉ. संपगावकरांनी के लेल्या आर्क सल् थि ला व गुंतवणूक नियोजनाबाबत आनंदी व समाधानी असल्याचा उल्ख करतात. ‘ ले सिद्धी असोसिएट्स’मार्फत डॉ. संपगावकर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता विशेष पद्धतीने आर्क नि थि योजन करतात. कारण उतारवयात मिळालेला पैसा व आयुष्यभराची पुंजी परत कमविणे शक्य नाही. त्यामुळे मिळालेले पैसे योग्य नियोजन करून, महागाईचा विचार करून योग्य ठिकाणी गुंतवणे व गुंतवणूकदार हयात असेपर्यंत के लेल्या गुंतवणुकीचे फायदे मिळवून देणे, तसेच महागाईच्या अनुषंगाने उत्पन्नदेखील वाढले गेले पाहिजे याचा विचार डॉ. संपगावकर करतात. एकीकडे महागाई वाढत असताना व्याजाचे दर मात्र कमी होत आहेत, अशावेळी के लेल्या गुंतवणुकीवर उत्पन्न वाढविणे हे आव्हानात्मक काम असते. यासाठी आपला गुंतवणूकविषयक सल्लागार (फायनान्शिअल प्लॅनर) हा उच्चशिक्षित, उच्चतम सेवा व सल्ला देणारा असावा. सेवानिवृत्तांच्या आर्क नि थि योजनात डॉ. संपगावकर यांचा हातखंडा असून, मोठ्या अधिकाऱ्यांपासून ते साधारण कर्मचाऱ्यांपर्यंतच्या मिळकतीच्या उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी वेळ ठरवून घेतात. यात सुसूत्रता राहावी म्हणून डॉ. संपगावकरांनी त्यांची अपॉइंटमेंट डायरी त्यांच्या www.drmilindsampgaonkar.com या वेबसाइटवर टाकलेली आहे. त्यामुळे अपॉइंटमेंट मिळविण्यामध्ये अत्येत पारदर्शकता असते. कोणीही इच्छुक या वेबसाइटवर जाऊन त्यांची वेळ बुक करू शकतो अथवा त्यांच्या स्वीय सहायकांना ९९६०७०२९४९ या क्रमांकावर संपर्क करू शकता.

महिलांकरिता ‘रिद्धीज लेडी विंग’ची स्थापना

महिलांकरिता ‘रिद्धिज लेडी विंग’ची ६ एप्रिल २०१९ रोजी स्थापना करण्यात आली. ‘रिद्धीज लेडी विंग’ या कंपनीद्वारे महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात त्या वापरत असलेल्या ब्रँडचे सनिटरी नॅपकिन आकर्षक पकॅिंगमध्ये मूळ किमतीवर अथवा प्रसंगी आकर्षक योजनेच्या अंतर्गत घरपोच दिली जातात. एवढेच नाही तर या धावपळीच्या जगात महिलांना त्या दिवसांचा विसर पडतो, अशावेळी टीम ‘रिद्धी लेडी विंग’ आपल्या ग्राहकांना वेळेआधीच आठवण करून सनिटरी नॅपकिन पोचवण्याची व्यवस्था करते. यासाठी डॉक्टरांनी खास प्रशिक्षित के लेल्या महिलांची तुकडी तयार केली आहे. व्हॉट्सअप क्रमांक ८८९८८९२९२९ / ८५३०५८७४२५ वर मेसेज करून, हव्या असलेल्या कंपनी अथवा ब्रँडचे नाव पाठवून ‘रिद्धीज लेडी विंग’च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचू शकते. सनिटरी नॅपकीनप्रमाणेच लहान बाळांसाठीचे डायपर्सदेखील उपलब्ध करून दिले जातात. सदर व्यवसायात नफा कमविणे हा उद्देश नसून जनसेवा हीच ईश्वरसेवा ही कं पनीची भावना आहे. रुग्णांना जवळपास एमआरपीवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देऊन अडल्ट डायपर्सदेखील उपलब्ध करून दिले जातात. खरेदीच्याच किमतीत विक्री के ली जाते. वरील कु ठलेही सेवा घरपोच देण्याकरता अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही.

कोविड योद्ध्यांचे विवरणपत्र मोफत

कोविड योद्धे म्हणून कार्यरत असलेल्या योद्ध्यांचा सर्वच स्तरांतून सन्मान केला जात आहे. तसा तो व्हायलादेखील हवा. परंतु डॉ. मिलिंद संपगावकर यांचे याबाबत वेगळे मत आहे. या सर्वांचा तेवढ्यापुरता सन्मान न करता, त्यांना आयुष्यभरासाठी उपयोग होईल असे काहीतरी करावे. ‘सिद्धी असोसिएट्स’च्या माध्यमातून सर्व कोविड योद्ध्यांच्या सन्मानार्थ एक योजना अमलात आणायची ठरविली आहे. ‘सिद्धी असोसिएट्स’ एक मल्टी स्पेशलिस्त फायनान्शिअल हब आहे. त्यांच्यामार्फत आपण विवरणपत्र (इन्कमटक्स रिटर्न) फाइल करतो. यापुढे कोविड योद्ध्यांना कोणतीही फी न आकारता ‘सिद्धी असोसिएट्स’तर्फे इन्कमटक्स रिटर्नफाइल केले जाणार आहे. कोविड योद्ध्यांमध्ये डॉक्टर्स र्सव हॉस्पिटल स्टाफ तसेच केद्र व राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, माध्यमांचे (मीडिया) कर्मचारी यांच्यासाठी ही योजना खुली करण्यात आलेली आहे. या योजनेत सहभागी होण्याकरिता ७७९६८७५८४४ वर संपर्क करावा.

मिळालेली पारितोषिके व सन्मान

डॉ. मिलिंद संपगावकर यांना आतापर्यंत जवळपास ३४० वेगवेगळ्या व्यावसायिक सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे, तसेच २४ सन्मान जाहीर झालेले असून, येत्या काळात ते मिळणार आहेत. यात प्रामुख्याने उल्ख करावा असे ‘एलआ ले यसी’च्या चेअरमन यांच्यातर्फे झालेला सत्कार, त्यांच्या पत्नीला – कीर्ती संपगावकर ‘एलआयसी ऑफ इंडिया’कडून मिळालेला ‘बिमारत्न’, ‘बिमा भूषण’ यांसारख्या पुरस्कारांचा समावेश आहे.

विमा स्वतः घेतो, मगच दुसऱ्यांना देतो

डॉ. मिलिंद संपगावकर म्हणतात, ‘‘मला नेहमी वाटते विमा ही काही विकण्याची गोष्ट नाही, ती प्रसार करण्याची गोष्ट आहे. मी एक गुंतवणूक सल्लागार आहे म्हणजे मी विमा विकतो, असे चित्र कधीही तयार के ले नाही. सर्वांत आधी विम्याची पॉलिसी मला स्वतःला पटत आहे का, हे मी पाहतो. ती पॉलिसी मला आवडली, की ती मी स्वतः आधी विकत घेतो. त्यानंतर मी ती इतरांनी का घेतली पाहिजे हे सांगतो. जे आपल्याला पटले नाही, ते विकण्यात अर्थनाही, हे माझे तत्त्व असल्याने मी ते नेहमी पाळतो.’’

संपर्कासाठी :

डॉ. मिलिंद संपगावकर यांचा खासगी संपर्क क्रमांक : ९९२१२१४२९९, ८३२९३६२७३९

कार्यालयाचा पत्ता : ७५४ ब, सदाशिव पेठ, विनायक आपाटमेट, तळमजला, कुमठेकर रस्ता, पुणे- ३०

Website : www.drmilindsampgaonkar.com | www.siddhiassociates.co.in

Mail Id : milind.sampgaonkar@siddhiassociates.co.in | milind@drmilindsampgaonkar.com

मराठी