राज्यातील होलसेल फार्मास्युटिकल डिस्ट्रिब्युटरमधील अग्रगण्य नाव तापडिया ग्रुप

तुम्ही एखादेस्वप्न पाहिलेआणि त्या स्वप्नपूर्तीसाठी रात्रंदिवस मेहनत केली; संकटांना, अनेक अडचणींना तोंड दिले, मात्र मागेहटला नाहीत; ठामपणे, अभेद्यपणे उभे राहिलात, तर आयुष्याचा
कायापालट होतो व इतरांसाठी प्रेरणादायी ठरतं.

असाच प्रवास झालाय तापडिया डिस्ट्रिब्युटरचा पन्नास हजारांच्या भांडवलातून सुरू झालेल्या या कंपनीचा व्यवसाय आज ४०० कोटींपर्यंत पोहोचला आहे. अनेक होतकरू तरुणांना त्यांनी स्वतःच्या व्यवसायात घेऊन, त्या व्यवसायात भागीदार बनवून, मालक म्हणून समाजात ताठ मानेनंजगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ३०० हून जास्त लोकांना त्यांनी रोजगार दिला आहे.

राज्यात होलसेल फार्मास्युटिकल्स डिस्ट्रिब्युटरशिपमध्ये एक मोठा ब्रँड म्हणजे तापडिया डिस्ट्रिब्युटर. मूळचं लातूर येथील स्थायिक असलेलं तापडिया कुटुंब व्यवसायाची संधी शोधण्यासाठी पुण्यात स्थायिक झालं. काहीशा नवख्या क्षेत्रात पदार्पण करून आपल्या कष्टाच्या जोरावर जुगलकिशोर, ओमप्रकाश या तापडिया बंधुंनी होलसेल फार्मास्युटिकल्स डिस्ट्रिब्युटर क्षेत्रात एक वेगळी उंची प्राप्त केली आहे. शेकडो लोकांना रोजगार व आपल्या कर्मचाऱ्यांनाच व्यवसायात सामील करून त्यांनाही उद्योजक बनवण्याचं काम यांनी केलंआहे. काही लाखांत सुरू केलेला व्यवसाय आज काही कोटींपर्यंत पोहोचला आहे.

प्रवास…

तापडिया कुटुंब मूळचंराजस्थानचं; परंतु काही वर्षांपूर्वी हेकुटुंब रोजगार व व्यवसायानिमित्त लातूर येथेस्थायिक झालं. त्यांच्या तीन पिढ्या लातूर येथील. जुगलकिशोरजींचे वडील व त्यांचे भाऊ हे लातूर येथे शेती करत. तापडिया कुटुंबीयांकडं त्या काळात जवळजवळ ३५ एकर शेती होती. जुगलकिशोर यांचे वडील किसनलाल व आई इंदुमती शेती करत. तर त्यांचे काका गोविंदाजी पुण्यामध्ये नोकरीनिमित्त आले. सुरुवातीला लढ्ढा अँड कंपनी या कपड्याच्या दुकानात त्यांनी काही वर्षं काम केलं. काका गोविंदाजी यांनी नोकरी करत-करत घरच्यांच्या मदतीने रविवार पेठेत तापडिया कंपनी नावानं छोटंसं कपड्याचं दुकान सुरू केलं. जसजशी आर्थिक परिस्थिती सुधारत गेली तसतशी तापडिया कुटुंबातील सर्व मुलं पुण्यात शिक्षणासाठी आली. जुगलकिशोरही लहानपणीच शिक्षणासाठी पुण्यात आले. जुगलकिशोर यांना दोन भाऊ व दोन बहिणी. सर्वांत मोठी बहीण भागीरथी, भाऊ लक्ष्मीनारायण, बहीण सरजू, भाऊ ओमप्रकाश व सर्वांत लहान जुगलकिशोर.तापडिया कुटुंब हे रविवार पेठेत राहत होतं. पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण जुगलकिशोर यांनी नूतन मराठी विद्यामंदिर, गवळी आळी, बुधवार पेठ तर दहावीपर्यंतचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागेत घेतलं. त्यानंतर जुगलकिशोर त्यांनी पुण्यातील बी.एम.सी.सी. कॉलेजमधून बी.कॉम. करण्याचा निश्चय केला. चांगले मार्क सल्यामुळे बी.एम.सी.सी. कॉलेजमध्ये त्यांना प्रवेशही मिळाला. दिवसभर कॉलेज व्यतिरिक्त दुकानात घरच्यांना मदत करून त्यांनी आपलंबी.कॉम.चं शिक्षण चालू ठेवलंहोतं.अभ्यासात हुशार असणाऱ्या जुगलकिशोर यांनी बी. कॉम. झाल्यानंतर आय. सी. डब्ल्यू.ए. करायचं ठरवलं. १९८५ साली त्यांचे ज्येष्ठ बंधू ओमप्रकाश यांनी खिवंसरा या व्यक्ती बरोबर पार्टनरशिपमध्ये पर्वती पायथ्याला मेडिकलचं दुकान टाकलं होतं. या दुकानात सकाळ संध्याकाळ माल आणून देण्याचं काम ते करत.

भावाच्या मेडिकल दुकानात काम करताना त्यांनी मेडिकल बिझनेसमध्ये असणाऱ्या संधी हेरल्या होत्या. याच क्षेत्रात आपल्याला मोठंकाही तरी करता येईल असंत्यांना वाटूलागलंहोतंपण वेळ मात्र प्रतिकूल होती.

जुगलकिशोर यांच्या वडिलांनी शेती करण्यासाठी मुनष्यबळ नसल्यानेती विकली होती. तेही त्यांचेबंधूगोविंदाजी यांच्यासोबत कपड्याच्या व्यवसायात पुण्यामध्ये सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी मान, अपमान पचवून एकेदिवशी जुगलकिशोर यांनी वडिलांकडून भांडवलासाठी पन्नास हजार तर काका भगवानदास यांच्याकडून पन्नास हजार रुपयेघेऊन तापडिया डिस्ट्रिब्युटर, ४५०/ बी, गुरुवार पेठ येथे मेडिकल होलसेलचंदुकान सुरू केलं. १६ फेब्रुवारी १९८५ रोजी सुरू केलेला हा व्यवसाय एका छोट्याशा दुकानात होता. जुगलकिशोर यांच्याकडे त्या वेळेस सायकलही नव्हती. त्यामुळे जवळ-जवळ सहा महिनेतेआपल्या मित्राच्या सायकलवर मालाची ने-आण करत असत. व आपल्या ग्राहकांना माल त्यांच्या दुकानापर्यंत पोहोचवत असत. त्यानंतर एक वर्षानेत्यांनी स्वतःची लुना घेतली व त्यावरून मालाची डिलिव्हरी करू लागले. व्यवसाय वाढू लागल्यामुळे हळहळूत्यांनी दोन माणसंही कामाला ठेवली. या काळात जुगलकिशोर हेनगर, पिंपरी-चिंचवड येथून माल आणत व बाजारात विकत. खरं तर या काळात भांडवलाची गरज त्यांना खूप होती. व्यवसायासाठी त्यांना या काळात काही हजार रुपयेलागत होते, १९८८ चा तो काळ होता. नंतर मार्च १९९० ला ‘तापडिया डिस्ट्रिब्युटर्स’ यांना सिप्ल दुकान, दुकानातील कामगार, वेगवेगळ्या कंपन्यांचे अधिकारी एवढंच त्यांचं विश्व होतं. जुगलकिशोर सांगतात, या काळात मी फक्त रात्री झोपण्यापुरतंच घरी जायचो. अनेक दिवस माझ्या मुलांशी माझा संवादही होत नसे. अशा काळात माझी पत्नी किरण यांनी कुठलीही कुरबूर न करता माझ्या व्यवसायाला प्रोत्साहन देत घरची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या या पाठबळामुळेच मी या काळात माझं संपूर्ण लक्ष व्यवसायामध्ये केंद्रित करू शकलो.

कंपन्यांचा वाढता प्रतिसाद

१९९२-९३ साली त्यांना बुट्स, वाईथ लिमिटेड (whyet Itd.) या मेडिकल क्षेत्रात मोनोपॉली असणाऱ्या कंपन्यांचीही डिस्ट्रिब्युटरशिप मिळाली. त्यामुळेव्यवसाय वाढीचं प्रमाण पुढेकाही पटींमध्ये वाढत गेलं. जुगलकिशोर तापडिया हेनाव होलसेल बाजारात मानानं घेतलं जाऊ लागलं. जुगलकिशोर सांगतात, या काळात अनेक बँकांकडे कर्जासाठी गेलो; परंतु कुठल्याही बँकेनं म्हणावं तसं सहकार्य केलं नाही. कर्जासाठी तारण देण्यासाठी कुठलीही प्रॉपर्टी माझ्याकडं नव्हती. त्यामुळेव्यवसायातील झालेला नफा हा पुन्हा भांडवलात गुंतवून व्यवसाय वाढवला. १९९९ साली रुपी बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी आपलं घर घेतलं. पुढील काळात व्यवसाय वाढत होता व व्यवसायातील अनेक संधी साधायच्या असतील तर अनेक लोकांना बरोबर घेऊन व्यवसाय करायला हवा हेजुगलकिशोर यांना जाणवलं. त्यामुळेत्यांनी आपल्याच दुकानातील कामगार, सेल्समन यांच्याबरोबर भागीदारी करत स्वतः भांडवल पुरवून त्यांना याच क्षेत्रात वेगवेगळेव्यवसाय सुरू करून दिले. जुगलकिशोर यांना माणसांची पारख चांगली असल्यामुळेत्यांच्या या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचेसर्व व्यवसाय नावारूपाला आणले. व व्यवसायाची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ लागली.

१९८५ साली सुरू केलेल्या या व्यवसायाची उलाढाल ही ४८ लाख रुपयेहोती. ती २०२० पर्यंत ४०० कोटींपर्यंत पोहोचली आहे. व्यवसायाचा एवढा मोठा टप्पा जुगलकिशोर यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्ण केला आहे. आज त्यांच्याकडे जवळ जवळ दीडशे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची डिस्ट्रिब्युटरशिप आहे. त्यापैकी बायर इंडिया लि., सिप्ला, डॉ. रेड्डी, एमक्युअर, जॉन्सन अँड जॉन्सन, ऑर्चिड, सनफार्मा, रेनबॅक्सि, टॉरेंट फार्मा या जगविख्यात कंपन्यां आहेत. जुगलकिशोर यांच्या तापडिया डिस्ट्रिब्युटर्स या कंपनीशिवाय वेगवेगळ्या आठ कंपन्या आहेत. यामध्ये ग्रीपील फार्मास्युटिकल्स प्रा. लि., ऑलिकॉन फार्मास्युटिकल्स प्रा. लि., बडनेरे लॅब्रोटरीज, तापडिया लाईफ सायन्स, तापडिया मार्केटिंग, तापडिया आय.टी. अँड एच. केअर एल.एल. पी., तापडिया ऑर्थोपेडिक्स, तापडिया ओव्हरसीज, तापडिया कॉस्मोजेन या सर्व कंपन्यांमध्ये जवळ-जवळ ३०० हून अधिक लोक काम करतात. जुगलकिशोर यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी बेस्ट सेलर म्हणून अनेक अवॉर्ड्स दिले आहेत. जुगलकिशोर सांगतात, मी व्यवसायामध्ये एवढा व्यस्त होतो की, मी अॅवॉर्ड, प्रसिद्धी या गोष्टींकडं कधीही लक्ष देऊ शकलो नाही.

सामाजिक कामे…

व्यवसायातील व्यस्ततेमुळं जुगलकिशोर यांना सामाजिक कामात प्रत्यक्ष भाग घेता येत नसला तरी तेगणेशोत्सव, दर वर्षीची पंढरपूरची वारी व इतर सार्वजनिक कामांत सढळ हातानं मदत करत असतात. अनेक गरीब व गरजूलोकांना औषधेपुरवत असतात. समाजभान ठेवत व समाजाला आपण काहीतरी देणेलागतो या भावनेतून त्यांनी काही गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही घेतलेली आहे. त्यासाठी त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च तेकरत आहेत. सामाजिक कार्याची आवड असणारेजुगलकिशोर यांनी सामाजिक जाणिवेतून आजपर्यंत अनेकांना विविध प्रकारे मदतीचा हात दिला आहे. तसेच अनेक गरीब रुग्णांना आरोग्यविषयक उपकरणे खरेदीसाठी जुगलकिशोर यांनी प्रत्यक्ष मदत केली आहे. त्यांचे सामाजिक मदतीचे कार्य अविरहित पणे सुरू आहे.

नव-उद्योजकांना जुगलकिशोर यांनी दिलेला कानमंत

तुम्हाला जर एखाद्या क्षेत्रात नाव कमवायचेअसेल तर अखंड परिश्रम करण्याशिवाय पर्याय नाही. सतत काम करीत राहिले पाहिजे, अखंड ध्यास त्या स्वप्नांचा केला पाहिजे. रात्र आणि दिवस त्याच्या नियोजनात असले पाहिजे. आहेत्या परिस्थितीला शरण न जाता तिला गुलाम बनवून आपली वाट चालत राहिली पाहिजे. संकटे अनेक येतील हो मग तुम्ही त्याच्याशी दोन हात करायला शिकले पाहिजे तरच तुम्ही मानसिक रित्या खंबीर होऊ शकता. त्यामुळे अपयश पचवण्याची सुद्धा ताकत येते. यश, अपयश हेहा जीवनाचा भाग बनवा दोन्ही परिस्थिती समतोल ठेवा. अपयशाने खचूनका आणि यशानेउथळ होऊ नका. आजचा तरुण मार्केट मधील स्पर्धा पाहून खचून गेला आहे. व्यवसायात न उतरण्याची तो अनेक कारणं देत बसतो शिक्षण झाल्यावरनोकरीनाही व्यकि म्हणून शिक्षण व्यवस्थेला नाव ठेवणारेहजारो बेरोजगार तरुण आपण पाहतो. भांडवल नाही. व्यावसायिक पार्श्वभूमी नाही, व्यवसायाची स्पर्धा वाढली अशी एक ना अनेक कारणेदेत अनेक तरुण आपल्या नशिबाला दोष देत आपल्या ऐन उमेदीचा काळ वाया एक घालवतात. प्राप्त परिस्थितीत कष्ट करून व्यावसायिक संधी शोधणं व त्यात यश प्राप्त करण यांना जमत नाही. असेतरुण आपल्या देशाला, शिक्षणपद्धतीला दोष देत बसतात. माझंएकच म्हणणं आहे व्यवसायात यशस्वी होण्यासाठी फक्त आणि फक्त मोठी इच्छा शक्ती लागतेबाकी सगळं आपोआप उभारत अनेक लोक तुमच्या मदतीला येतात आणि तुमच्या समस्या सोडवतात पण तुम्ही काहीच हालचाल नाही केली तर तुम्हाला कोणी विचारत नाही.

टिळक रोडवरील हिराबाग बिझनेस सेंटरमधील अाधुनिक साधनांनी उभारलेले डेंटल क्लिनिक.

सद्यःस्थितीला रिटेल व्यवसायात ई कॉमर्स आलेले आहे. सध्या आम्ही रिटेलची 35% ची गरज पूर्ण करत आहोत. आणखीन काही कं पन्यांची डिस्ट्रिब्युशनशिप मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचबरोबर राज्यभरात व्यवसायाची व्याप्ती वाढवत आहोत. पुणे शहराति रटेल व्यावसायिकांना वेगवेगळ्या भागात औषधे सहज उपलब्ध व्हावीत म्हणून औध, हडपसर या ठिकाणी स्टोअर्स उभे करीत आहोत.

राज्यातील १०० दिग्गज फार्मास्युटिकल्स डिस्ट्रिब्युटर्सना सोबत घेऊन मी ९-एम कं पनी चालू केली असून, या कंपनीच्या शेअर्स होल्डर्सना पहिल्या वर्षापासून लाभांश दिला आहे. या कं पनीचा भाग होऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांचे आम्ही स्वागत करीत आहोत.

९-एम कंपनी, मॅनेजिंग डायरेक्टर

काका ओमप्रकाश तापडिया व वडील जुगलकिशोर तापडिया यांचा आदर्श घेऊन मीही वाटचाल करीत आहे. यांच्यासारखेच मलाही माझ्या क्षेत्रात नाव कमवायचे
आहे. मी स्वतःच टिळक रोडला हिराबाग बिझनेस सेंटरमध्ये डेंटल क्लेनिक सुरू केले आहे. यामधून अनेक रुगांना बरे करता यावे हाच माझा प्रयत्न असतो.

– डॉ. विशाल तापडिया, (BDS, MDS (Oral & Maxillofacial Surgery)

वडील ओमप्रकाश तापडिया व काका जुगलकिशोर तापडिया यांनी ज्या मेहनतीने हा ग्रुप उभारला आहे त्याचं करेल तितकं कौतुक कमीच आहे. आमचं एकत्र कुटुंबहेच आमच्या यशाचं रहस्य आहे. या ग्रुपच्या नावाला जपणं ही माझी प्राथमिकता आहे. माझा प्रशासकीय कामात सहभाग असतो.

– अनुप तापडिया, (MBA)

तुम्ही काम करीत राहिला की आपोआप रोपट्याचा वटवृक्ष निर्माण होतो. अत्यंत कमी भांडवलात फर्मास्युटिकल डिस्ट्रिब्युटरच्या व्यवसायाचा मोठा वटवृक्ष निर्माण झाला आहे. गेल्या पस्तीस वर्षांची ही मेहनत आहे. सुरुवातीपासून ग्राहकांचा आम्ही विश्वास जिंकत गेलो. अत्यंत सचोटीने आम्ही काम करीत राहिलो आणि अत्यंत सरळ मार्गाने. त्याचबरोबर हे करीत असताना गोरगरिबांचा आशीर्वाद घेण्यास आम्ही विसरलो नाही अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करीत इथपर्यंत आलो आहोत. मी तापडिया ग्रुपच सर्व प्रशासकीय काम पाहतो. यापुढेही आणखी या ग्रुपचा विस्तार करणे हे ध्येय असणार आहे.

– ओमप्रकाश तापडिया

काका ओमप्रकाश तापडिया व वडील जुगलकिशोर तापडिया यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा तापडिया ग्रुप उभारला आहे. त्यांना कित्येक वेळा दपुारचं जेवणही
कामामुळे घेता आलं नाही हे मी अनेक वेळा पाहिलं आहे. या ग्रुपमध्ये मी मार्केटिंग विभागाचं काम पाहतो.

– वरुण तापडिया (बी. फार्मसी)

समाजासाठी पाहिलेले स्वप्न…

पुढील पंधरा वर्षांत गरीब लोकांसाठी हॉस्पिटल व मंदिर उभारायचं आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळावी हा त्यामागचा माझा उद्देश आहे. पैशाअभावी अनेक गरीब लोकांना योग्य तो उपचार घेणं शक्य होत नाही. तो कमी खर्चात किंवा मोफत त्यांना उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे.

कुटूंबातील सदस्यांबद्दल बोलताना….

तापडिया डिस्ट्रिब्टयुर्सच्या यशस्वितेमध्ये कु टुंबातील सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. श्री. जुगलकिशोर यांचे वडील किसनलाल सध्या हयात नाहीत. आई इंदबूाई या सध्या आजारी आहेत. आईबद्दलची आठवण म्हणजे आईने मला माझ्या खडतर काळात बऱ्याचदा हिम्मत दिली, वेळप्रसंगी माझ्यासाठी सकाळी लवकर उठणे, माझ्याकडे जातीने लक्ष देणे या गोष्टी तिने के ल्या आहेत. तसेच मोठा भाऊ ओमप्रकाश यांनी तर मला माझ्या व्यावसायिक वाटचालीत अत्त खंबीर स यं ाथ दिली. मी कामानिमित्त सतत बाहेरगावी असतांना या व्यवसायाची धुरा त्यांनीच सांभाळली आहे. त्यांच्यामुळेच मी व्यावसायिक प्रगती करू शकलो. पत्नी किरणबद्दल जुगलकिशोर यांच्या भावना कृ तज्ञतेच्या आहेत. पत्नीने त्यांना त्यांच्या वाटचालीत खंबीर साथ दिली. व्यस्ततेमुळे मला घराकडे लक्ष देणं शक्य होत नसतांना मुलांचे संगोपन, शिक्षण या व घरातील इतर जबाबदाऱ्या पत्नी किरण यांनी अत्त यं व्यवस्थित सांभाळल्या आहेत. मोठा मुलगा डॉ. विशाल तापडिया हा एम.डी. असून टिळक रोडला त्याचं क्लिनिक आहे. सून रेणू ही इंजिनियर असून ती उत्तम गृहिणी आहे. छोटा मुलगा वरुण हा बी.फार्म. असून सथ्या एम.बी.ए. च शिक्षण घेत आहे. मोठा भाऊ ओमप्रकाश यांचा मुलगा अनूप हा हाॅस्पिटल सप्लाय व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहे.

विविध पदांवर के लेले काम…

दिवसातील साधारण बारा तास व्यवसायामध्ये मग्न असणारे जुगलकिशोर हे के मिस्ट असोसिएशनची अनेक वर्षांपासून संलग्न आहेत. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील या असोशिएशनचे 80 हजारांहून जास्त के मिस्ट सभासद आहेत. पन्नास कोटींहून अधिक भांडवल असणाऱ्या या असोसिएशनच्या कं पनीमध्ये जुगलकिशोर हे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. 2009 साली ते के मिस्ट असोसिएशनचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष होते, तर 2012 ते 2015 महाराष्ट्राचे जाॅइंट सेक्रेटरी म्हणून त्यांनी या असोसिएशनचे काम के ले आहे. जुगलकिशोर यांनी MSCDA Ltd. AIOCD Ltd., AIOCD-AWACAS Ltd. या तीन कं पन्यांची कामे पाहायला सुरुवात केली तेव्हापासून या कं पन्यांनी चांगली व्यावसायिक कामगिरी के लेली आहे. यासाठी जुगलकिशोर यांच्या अनुभवाचा फायदाच झाला. पुढे काही कारणास्तव राजीनामा दिला. या वर्षी म्हणजेच 2021 पासून जुगलकिशोरजी या असोसिएशनच्या कामात अधिक सक्रिय झालेले आहेत. स्वतःचा एवढ्या मोठ्या व्यवसायाची धुरा सांभाळतांनाच असोसिएशनलाही त्यांनी भरपूर वेळ दिलेला आहे. अजूनही दर मंगळवार व बुधवार ते असोसिएशनच्या कामासाठी मुंबईला जात असतात. या असोसिएशनची ताकद फार मोठी आहे असं जुगलकिशोरजी मानतात. सदर काम करीत असतांना बहु दा असोसिएशन व व्यावसायिकांच्या फायद्यासाठी ते आपली भूमिका मांडत आहेत व त्याचा सर्वांनाच फायदा होत आहे.

मराठी