दर्जा व विश्वास या दोन आघाड्यांवर प्रामाणिकपणे देण्यात येणारे योगदान एखाद्या व्यवसायाला किती उची मिळवून देऊ शकते हे पाहायचे असेल तर अमरावतीच्या अमृता हॅचरीज अॅण्ड फुड्स या प्रतिष्ठानला नक्कीच भेट द्या. अमृता चिकनचे ब्रान्ड विकसित करून शेकडो महिलांच्या सक्षमीकरणाचा ध्यास त्यांनी घेतली अन् यशाकडे झेप घेतली. डॉ. शरद भारसाकळे हे त्या व्यक्तीचे नाव.
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील हयापूर बेलोरा या लहानशा खेड्यात डॉ. शरद भारकासळेयांचा जन्म झाला. वडील नारायणराव शेतकरी तर आई गोकर्णा बाई या गृहिणी होत्या. प्राथमिक शिक्षण गयापूर येथे घेतल्यावर नालवाडा येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत त्यांनी पुढील शिक्षण घेतले. नतरं दर्यापूरच्या प्रबोधन विद्यालयात शिकले. आठव्या वर्तचगा त्यांनी पशुवैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. दहावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर या क्षेत्रात ताबडतोब नोकरी लागते, असा त्यांचा विचार होता. त्या काळात प्रा. बी. जे. मोरेहेत्यांचे शिक्षक होते. बारावीत असताना परीक्षेच्या वेळीच वडिलांचे निधन झाले. डॉ. शरद भारसाकळेयांना टायफाइड झाला. त्यातच परीक्षा दिली व पुढील शिक्षणासाठी नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला. शिक्षण घेतल्यावर नोकरीचा शोध घेतला, पण शासकीय नोकरी लागली नाही. त्यामुळे त्यांनी रायगड जिल्ह्याच्या खोपोली येथे १५०० रुपयात नोकरी स्वीकारली. १९९१ चा तो काळ होता. तेथून अहमदनगरच्या अग्रोटेक हॅचरी अॅण्ड फुड्समध्ये १९९३ पर्यंत नोकरी केली. या ठिकाणची नोकरी सोडून ते गावाला परतले. भावाच्या हॉटेलमध्ये काम सांभाळू लागले. त्यानतरं १९९४ ते १९९७ पर्यंत एका सहकारी कुकुटपालन संस्थेत नोकरी केली. मात्र स्वतःचे काहीतरी करावे हा विचारत्यांना स्वस्त बसू देत नव्हता. अखेर १९९८ साली अमरावतीत श्रीकृपा पोल्ट्री फुड्सची सुरुवात करण्यात आली. त्यासाठी एक युनिट त्यांनी विकत घेतले. भावाने आर्थिक साहाय्य केले. पशुवैद्यकीय क्षेत्रात असलेले अनुभव तसेच या कामाची प्रचंड आवड असल्याने श्रीकृपा पोल्ट्री फुड्सची भरभराट काही वर्षांतच सुरू झाली. २०१३ मध्ये अमृता हॅचरीज अॅण्ड फुड्सची स्थापना झाली. वर्षभरातच ब्रॉयलर ब्रिडिंगचा फार्म सुरू झाला. डॉ. भारसाकळेयांना कोंबड्यांमध्ये फारच रस असल्यानेत्यांच्या खाद्यात निरनिराळे प्रयोग करून त्यांनी अधिकाधिक उत्तम खाद्य तयार करण्यास सुरुवात केली. आपला व्यवसाय वाढविण्यासोबतच या क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा मदत व्हावी, त्यांचा देखील व्यवसाय वाढावा यासाठी त्यांनी कुकुटपालनाचे मोफत मार्गदर्शन सुरू केले. त्यातूनच अमृता हॅचरीज ही संस्था अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भ तसेच सपूंर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आली.
आपल्या कामाप्रती निष्ठा असलेल्या डॉ. शरद भारसाकळेयांनी कधीच कोणत्या पुरस्कारासाठी अर्ज केला नाही. त्यासाठी वेळ नसल्याचे ते सांगतात. त्यापेक्षा आपलेकाम बरेहा त्यांचा दृष्टिकोन सर्वांपेक्षा त्यांना वेगळेस्थान देणारा ठरला आहे. २००५ पर्यंत विदर्भामध्ये पोल्ट्री ही प्रामुख्याने मुक्त स्वरूपातील होती. यातून पशुखाद्याला चांगली मागणी होती. मात्र त्यानतरं अनेक मोठ्या कंपन्यांनी करार पोल्ट्री सुरू करीत स्वतःच पशुखाद्य व अन्य सुविधा पुरवण्यास सुरुवात केली. परिणामी, ग्राहकांचे प्रमाण एकदम कमी झाले. हा शरद भारसाकळेयांच्यासाठी आव्हानांचा काळ होता. तो वेळीच ओळखत २०१३ मध्ये डॉ. भारसाकळेयांनी स्वतःच करार पोल्ट्री सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २.५ लाख प्रती माह क्षमतेची हॅचरी उभारली. या सर्व उद्योगातून शेकडो लोकांना रोजगार मिळाला. बहुतांश कंपन्या मोठ्या व आर्थिक सक्षम अशा शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करतात. मात्र डॉ. शरद भारसाकळेयांनी अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला महत्त्व दिले. त्यांनी एक हजार, अडीच हजार, पाच हजार पक्षी असेखास मॉडेल बनवले. त्यातून शेतकऱ्याच्या घरात १५ ते ३० हजार रुपये प्रतिमाह कसे जातील, या अनुषगाने रचना केली. दरातील तेजीचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळतो. पक्षाचेदीड महिन्यात दोन किलोपेक्षा अधिक वजन मिळण्यासाठी सामान्यतः ३.५ किलो खाद्य लागते. या निर्रधाित पशुखाद्यामध्ये बचत करीत वजन मिळविल्यास शेतकऱ्यांना वाचविलेल्या पशुखाद्याला प्रती किलो २० रुपयेबोनस दिला जातो.