न्यूरॉन हॉस्पिटलची नागपूरस्थित सुसज्ज इमारत.

दवा देत दवा घेणारे नागपूरचे सेवाव्रती डॉ. प्रमोद गिरी, डॉ. चंद्रशेखर पाखमोड

राज्याची उपराजधानी नागपूर हे मध्य भारतातील रुग्णांसाठी आशेचे ठिकाण आहे. गुंतागुंतीच्या व तेवढ्याच नाजूक अशा मेंदूवरील उपचारासाठी गेल्या काही वर्षांपासून नागपुरातील ‘न्यूरॉन हॉस्पिटल’ हे विश्वासाचे आणि आघाडीचे नाव ठरले आहे. अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून येऊनही आज ‘न्यूरॉन’ हॉस्पिटलच्या रूपाने अतिशय गुणवत्तापूर्ण उपचार व विश्वासाची उभारणी केली आहे, दोन डॉक्टर मित्रांनी. ‘दवा देत दुवा घेणारे’ हे सेवाव्रती आहेत प्राध्यापक डॉ. प्रमोद गिरी व डॉ. चंद्रशेखर पाखमोडे..

डॉ. प्रमोद गिरी आणि डॉ. चंद्रशेखर पाखमोडे या दोन न्यूरोसर्जन्सनी एकत्र येत शून्यातून ‘विश्‍व’ निर्माण करण्याचा ध्यास घेतला. हा ध्यास रुग्णसेवेचा आहे. अपघातात जखमी झाल्यानंतर मेंदूला इजा झाली. स्पाईनमध्ये इजा झाल्यास रुग्णाचा जीव वाचवणे मोठे आव्हान असते. हे आव्हान पेलवत आपल्या जादूई बोटांनी रुग्णांचा जीव वाचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न मागील वीस वर्षांपासून अविरत सुरू आहेत. यामुळेच मोठा प्रकल्प त्यांच्या हातून पूर्ण झाला. स्वत:ला रुग्णसेवेत झोकून दिल्यानेच मध्य भारतातील नागरिकांसाठी उपराजधानीत ‘न्यूरॉन’ हे आरोग्यदायी मंदिर तयार झाले. या मंदिराचे दोन देवदूत डॉ. गिरी आणि डॉ. पाखमोडे. केवळ डॉक्टर नाहीत तर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी त्यांच्याजवळ संवेदनशील मनही आहे. यामुळेच या दोन्ही देवदूतांच्या हातून शासनाच्या मेडिकलशी संलग्नित अतिविशेषोपचार रुग्णालयात व पदव्युत्तर संशोधन संस्थेत सेवा देत आहेत. डॉ. गिरी अजूनही प्रोफेसर म्हणून गरिबांच्या मेंदूवर दररोज एकतरी शस्त्रक्रिया येथे करतात. या दोन्ही डॉक्टरांचे आयुष्याचे वर्तुळ पाहिले तर ते सधन कुटुंबातील नाहीत. त्यांचे आयुष्य र्वसामान्यांसारखे. मध्यम कुटुंबाची किनार त्यांच्या आयुष्याला आहे. यामुळेच त्यांची उंच झेप प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

प्रोफे सर डॉ. प्रमोद गिरी

अकोला येथील मातीत जन्मलेल्या एका तरुणाने आज मध्यभारतातील प्रमुख वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली. परंतु आपले सामाजिक दायित्व तसेच कर्तृत्वाने त्यांनी रुग्णांची मने जिंकली. रुग्णांच्या मनावर आपले नाव कोरत रुग्ण आणि डॉक्‍टर यांचे संबंध विश्‍वासाचे आहेत, हे सिद्ध करणारे नाव म्हणजे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी.

डॉ. गिरी यांचे वडील जनार्दन सहकारी निबंधक विभागात कारकून होते आणि आई इंदिरा गृहिणी. एक भाऊ आणि बहीण एवढेच कुटुंब. आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि स्वबळावर समाधानाने जीवन जगावे. अशी त्यांच्या पालकांची इच्छा पूर्ण करणारे डॉ. प्रमोद गिरी. मात्र त्यांच्या रुग्णसेवेमुळे ‘मेंदूचे मेकॅनिझम शाबूत ठेवणारा देव’ अशी पदवी सुपर स्पेशालिटीतून उपचार करणाऱ्या रुग्णांनी बहाल केली.

प्रमोद यांनी एमबीबीएस व एमएस (जनरल सर्जरी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडिकल) पूर्ण केले. एसजीपीजीआय लखनऊ येथून न्यूरोसर्जरीमध्ये एमसीएच केल्यानंतर २००७ मध्ये त्यांनी स्वतंत्रपणे प्रॅक्‍टीस सुरू केली. यासोबतच गरिबांची रुग्णसेवा करता येईल, या उदात्त हेतूने विदर्भाचे भूषण असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते न्यूरोसर्जरी विभागप्रमुख आहेत. त्यांचे शैक्षणिक आयुष्य अतिशय उंचावलेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील १७ प्रकाशन, राष्ट्रीय स्तरावरील पाच प्रबंध त्यांच्या नावावर आहेत.

याशिवाय डॉ. रामडवार आयडियल स्टुडंट अवॉर्ड, एमसीएच नॅशनल स्कॉलर अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आले. मात्र, रुग्ण बरा होणे, हाच मोठा सन्मान ते मानतात. डॉ. प्रमोद गिरी यांच्या पत्नी डॉ. मंजूषा या पेडियाट्रिक डेव्हलपमेंट न्यूरोलॉजिस्ट आहेत. त्यांच्या मुलीचे नाव मिताली असून, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असे हे कुटुंब आहे.

डॉ. प्रमोद गिरी समाजसेवेचे धनी आहेत. रस्त्यावर अपघात झाल्यानंतर रुग्णाला स्वतः रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करणारा देवमाणूस म्हणून डॉ. गिरी यांचे नाव आहे. त्रिमूर्तीनगरातील रस्त्यावर अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणारे डॉ. गिरी. त्यांच्या आयुष्यातील हा प्रसंग अनेकांनी नजरेत साठवून ठेवला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना ‘येशू मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तदनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना ‘समाजभूषण’ पुरस्कारही मिळाला आहे.

डॉ. चंद्रशेखर पाखमोडे

डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचा जन्म नागपूरचा. वडील कृष्णदास शारदा विद्यालयात मुख्याध्यापक. आई गणेशनगर कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका. घरी दोन भाऊ आणि बहीण. आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने घरातील वातावरण साहजिकच शिक्षणाला पोषक होते. सर्वात मोठे बंधू दंत चिकित्सक असून, अधिष्ठाता पदावर कार्यरत आहेत. दुसरे बंधू भूजल विभागात सहायक संचालक आहेत. बहिणीचा विवाह झाला. चंद्रशेखर लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचे. दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव होते. एमबीबीएस व सर्जरीत एमएस त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडिकल) पूर्ण केले. पुढे मुंबईच्या केईएम रुग्णालयातून एचसीएच केले. अमेरिकेतील बारो न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन आणि प्रॅक्‍टीस केली. त्यानंतर नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुजू झाले.

गरीब रुग्णांची पाच वर्षे सेवा केली. ही अनुभवाची गाठ बांधून २००६ मध्येस्वत:ची स्वतंत्र प्रॅक्‍टीस सुरू केली. त्यांनी सादर केलेल्या शोध प्रबंधाला ‘बेस्ट पेपर अवॉर्ड’ मिळाला. केईएम मुंबईत त्यांना ‘बेस्ट रेसिडेंट’ अशा किताबाने गौरविण्यात आले. डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांच्या पत्नी डॉ. मनीषा ऍनेस्थिटिस्ट आहेत. वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात चंद्रशेखर-मनीषा यांचा गोड संसार सुरू आहे. मुलगा अद्वैत आणि मुलगी अनन्या. रुग्णसेवेतून समाजकार्य हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग. एनएसआयचे ते सदस्य असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी दोन आणि राष्ट्रीय परिषदेसाठी तीन संशोधन अहवाल सादर केले आहेत. त्यांच्या भविष्यातील रुग्णसेवेसाठी शुभेच्छा

डॉ. प्रमोद गिरी व डॉ. चंद्रशेखर पाखमोडे.

आम्ही दोघे…

आम्ही मेडिकलमध्ये एकत्र शिकलो. २०१४ मध्ये दोघानी एकत्र येऊन ‘न्यूरान ब्रेन’, स्पाईन ॲन्ड क्रिटिकल सेंटर उभारले. विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड या भागातून रुग्ण आमच्याकडे येतात. त्यांची काळजी घेण्यासोबतच त्यांना उच्च दर्जाचे उपचार देताना कोणताही कसूर आम्ही करीत नाही. दर महिन्याला २०० शस्त्रक्रिया करतो. आर्थिकदृष्ट्या सबल असो, दुर्बल, अशा सर्वच रुग्णांना जेवणापासून ते उपचारापर्यंतची सेवा देण्याचे काम यूरान ब्रेनमध्ये होते. मेंदूवर उपचार ये करताना वेळ महत्त्वाची असते. गरीब रुग्णांना कधीही परत पाठवीत नाही. यूरानमध्ये न्रॉनमध् न्यरो नेव्हिगेशनची सुविधा आहे. अचूकपणे ट्युमर काढता येतो. प्रत्येकाच्या आयुष्यात न्यरोर्जनची भूमिका महत्त्वाची असते. आम्ही उपचार करताना पैशाचा विचार करीत नाही.

रुग्णाचा जीव वाचवणे हाच ध्यास असतो. न्युरानमध्ये सुसज्ज अत्याधुनिक असे दोन ऑपरेशन थिएटर आहेत. २४ तास रुग्णसेवेत असतात. सिटी स्कॅन पोर्टेबल हे न्युरानचे खास वैशिष्ट्य. न्युरानमध्ये सपूंर्ण सघंटित यंत्रणा आहे. सर्व सहकारी आणि कर्मचारी पूर्ण प्रशिक्षित आहेत. २४ तास रुग्णांच्या सेवेत उपलब्ध असतात. ४० बेडस्चे आयसीयू आहे. ४५ व्हेंटीलेटर्स आहेत. आम्ही कठीणातील कठीण शस्त्रक्रिया करतो. दिवसात किमान पाच जणाचे जीव आम्ही वाचवितो, हे आमचे कर्तव्य समजतो.

कोरोनाकाळातील न्यूरॉनमधील रुग्णसेवा

न्यूरॉन मध्य भारतातील न्यूरोसर्जरीची एकमेव अद्ययावत संस्था आहे. येथे न्यूरो ट्रॉमा मॅनेजमेंट, स्पाईन ट्रॉमा, ब्नरे ट्युमर, स्पाईन ट्युमर, वॅस्कुलर ॲनोमली, पेरिफे रल नर्व सर्जरी, सर्जरी फॉर ऑरबीटल ॲण्ड पीट्युटरी ट्युमर, पेडियाट्रिक न्यूरो सर्जरी, न्यूरोइंडोस्कोपी असेउपचार एका छत्राखाली होतात. दरवर्षी तीन हजार न्यूरोसर्जरी होतात. तर दीड लाखावर रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी के ली जाते. न्यूरो नेव्हिगेशन, पोर्टेबल सीटी स्कॅन, मायक्रोस्कोपिक इंडोस्कोपिक सर्जरी या अद्ययावत तंत्रज्ञानासोबत रोबोटिक पनुर्वसन कें द्र असलेलेएकमेव न्यूरॉन हॉस्पिटल आहे. कोरोना महामारीच्या वर्षभराच्या काळात साडेचारशेतेपाचशेन्यूरोसर्जरी करून कोरोना तसेच इतर रुग्णांचे जीव वाचवण्यात आले. कोरोना काळात मानवतेची जाण ठे वनू कोरोनाबाधितांसाठी शासनाच्या दरानसार ु कुठलाही ८०-२० चेवर्गीकरण न करता सर्व रुग्णांना शासनाच्या दरातनू उपचार केले.

रोबोटिक फिजिओथेरपी

पक्षाघातानंतर रुग्णाला पूर्वी पारंपरिक फिजिओथेरपी दिली जायची. परंतु दोन-अडीच वर्षांपूर्वी मेंदरोगानंतर ू यातून येणाऱ्या अपंगत्वातून रुग्णाचे पुनवर्सन करणे, त्याला त्याच्या पायावर उभेकरणे, आत्मनिर्भर करणे, यात बराच कालावधी लागतो. मात्र आता हा कालावधी कमी करण्यासाठी ‘होकोमा’ हेअद्ययावत रोबोटिक यंत्र मध्यभारतात नागपुरातील न्युरॉनमध्ये उपलब्ध आहे. या यंत्रामुळेखाटेवरील रुग्णाकडूनही ‘फिजीओथेरपी’करून घेऊन त्यांच्या हातापायात ताकद मिळवून देणेशक्य झाले. गेल्या अडीच वर्षांत ‘पॅरालिसिस’, ‘स्ट्रोक’, ‘स्पायनल इन्जुरी’, ‘ब्रेन इन्जुरी’चेनंतर फिजिअथेरीपीच्या ४० हजारांवर रुग्णांनी याचा लाभ घेतला. ‘होकोमा’ ही ‘रोबोटिक’ यंत्रणा उभी करण्यासाठी डॉ. गिरी आणि डॉ. पाखमोडेयांनी परिश्रम घेतले. यातील ‘लोकोमॅट’ उपकरण खाटेवर असलेल्या रुग्णाला जमिनीपासून काही अंतरावर अलगद उचलते. रुग्णाकडून चालण्याच्या व्यायामापासून तर इतरही महत्त्वाचेव्यायाम करून घेते. ‘आर्मिओ स्प्ग’ रिंया रोबोटिक यंत्रामुळेहाताची ताकद तर‘इरिगो’ यंत्रामुळेपायाची ताकद परत येण्यास मदत होते. ‘अ‍ॅण्डीगो’रोबोटिक यंत्रामुळेचालण्याचा व्यायाम करून पडण्याची भीती दरूके ली जाते. विशेष म्हणजेहेचारही रोबोटिक यंत्र प्रत्येक व्यायामाच्या वेळी एक ‘टास्क’ देऊन रुग्णांकडून करवून घेतात. यामुळेरुग्णामध्ये आनंदासोबतच आत्मविश्वास निर्माण होतो. पाश्चात्य देशांमध्ये रोबोटिक्सचेतंत्रज्ञान बरेच विकसित झालेअसून, त्याच तोडीचे यंत्र न्यूरॉनमध्ये उपलब्ध आहेत.

मातृसंस्थेवर प्रेम करणारे डॉ. गिरी आणि डॉ. पाखमोडे

मेडिकल ही डॉ. प्रमोद गिरी आणि डॉ. चंद्रशेखर पाखमोडेया दोघांचीही मातृसंस्था आहे. या संस्थेवर त्यांचे प्रेम आहे. यामुळेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोघांनीही सेवा देण्याचेकाम के ले. डॉ. पाखमोडेयांनी सुपरमध्ये पाच वर्षे सेवा दिली. सध्या सुपरच्या मेंदरोगू विभागात प्रोफे सर म्हणून डॉ. प्रमोद गिरी यांची सेवा सुरू आहे. येथेकाम करताना त्यांना मानसिक समाधान मिळते, हेच यांचेमत. येथील गरिबांची एकप्रकारे सेवा करण्याचेपुण्यकर्म मिळत असल्याचेयांचेमत. ब्रेन ट्यूमर असो की, अपघात आपत्कालीन स्थितीत आलेला डेड इंज्युरीचा रुग्ण असो. रुग्णाचा जीव वाचविणेहा एकच ध्यास असतो. गंभीर परिस्थितीत रुग्णांना अनुकूल धोरणेराबवून रुग्णांचा जीव वाचविणेहेच या दोन्ही डॉक्‍टरांचेकर्तव्य ते पार पाडत आहेत. विशेष असेकी, सुपर स्पेशालिटीला पदव्युत्तर संस्थेचा दर्जा मिळाला असून, येथे‘एमसीएच’ हा न्यूरोलॉजी विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रोफे सर म्हणून डॉ. गिरी परिश्रम घेत आहेत. शासनाची या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे

न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये झालेल्या यशस्वी दुर्मिळ शस्त्रक्रिया

  • धोकादायक ब्रेन ॲनिरिजमग्रस्त बालकाला जीवदान
  • मेंदतूून टेनिसबॉल आकाराचा ट्यूमर काढून ज्येष्ठ नागरिक महिलेचा वाचवला जीव
  • मेंदुच्या दुर्मीळ ‘ॲंन्युरिजम’ आजाराची महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
  • डोळ्यांतून मेंदपूर्यंत पोहोचलेली सळाख काढून सात वर्षीय बालिकेचा वाचवला जीव
  • अशा प्रकारेच अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत

कुटुंबाची शक्ती

(डावीकडून उजवीकडे) डॉ. मंजूषा गिरी, डॉ. प्रमोद गिरी, डॉ. चंद्रशेखर पाखमोडे व डॉ. मनीषा पाखमोडे.
गतवर्षी देण्यात आलेला ‘सकाळ एक्सलन्स अवॉर्ड’ नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वीकारताना डॉ. गिरी आणि डॉ. पाखमोडे.

रुग्णासाठी सर्वोत्तम उपचारपद्धती प्रत्येकच डॉक्टर ठरवतात. यानंतरही उपचारादरम्यान पेशंटच्या बाबतीत काही गुंतागुंत झाली आणि काही अप्रिय घटना घडली, तर संबंधित डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यात कटुता निर्माण होते. ही कटुता टाळण्यासाठी डॉक्टरांशी संवाद साधावा. डॉक्टर शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठीच प्रयत्न करतात. वैद्यकीय ज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरीही डॉक्टरचे महत्त्व कमी होणार नाही, हे कोरोनासारख्या महामारीने दाखवून दिले आहे. क्लिष्ट आजारांवर संशोधनातून उपचारात नवे बदल येतात, हे रुग्णहितासाठीच. यामुळे डॉक्टर हे फॅमिली डॉक्टरच असतात.

– डॉ. चंद्रशेखर पाखमोडे, न्यूरोसर्जन, न्यूराॅन हॉस्पिटल, नागपूर

पूर्वी आपण ‘फॅमिली डॉक्टर’कडे जात होतो. घरातील लहान-मोठ्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी ते घेत असत. रात्री-अपरात्री कधीही आपण हक्काने त्यांच्याकडे उपचारासाठी जात होतो. आज सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातूनही अगदी घरचा व्यक्ती म्हणून प्रत्येक रुग्णावर उपचार होतो. रुग्ण-डॉक्टर संबंधांचा पाया विश्वास हाच आहे. शेवटी रुग्ण हेच डॉक्टरचे दैवत होय.

– डॉ. प्रमोद गिरी, विभागप्रमुख, न्यूरॉलॉजी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर

मराठी