रंगद्रव्यांतील वैश्विक 'सुदर्शन'

तंत्रज्ञानाधारित उत्पादनाचा जागतिक दर्जा आणि उत्तम ग्राहक सेवा यामुळे सुदर्शनचे निर्विवाद वर्चस्व आहे. एवढेच नाही, तर रंगद्रव्ये उत्पादन करणाऱ्या पहिल्या चार कंपन्यांमध्ये सुदर्शनचा समावेश आहे. व्हायब्रंट आणि इनोव्हेटिव्ह संस्कृतीसह दर्जेदार उत्पादन उपलब्ध करण्याची परंपरा सुदर्शनने जपली आहे. - जीवराज चोले, माध्यम सल्लागार

सुदर्शन केमिकल्स रंगद्रव्य (पिगमेंट) आणि रासायनिक उत्पादनात जागतिक स्तरावरील एक प्रमुख नाव. यंदा आपला महाराष्ट्र एकसष्टी साजरा करत असतानाच डॉ. आर. जे. राठी व ब्रदर्सयांच्या द्रष्ट्या नेतृत्वात १९५२ मध्ये स्थापन झालेली सुदर्शन केमिकल्स सत्तरीकडे दिमाखात वाटचाल करत आहे. आयातीवर अवलंबून असलेल्या या क्षेत्रात भारतीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दर्जेदार रंगद्रव्ये देत आज गेल्या सात दशकांत सुदर्शन केमिकल्स एक प्रमुख भूमिका बजावत आहे. १९ लोकांना घेऊन पुण्यात मोजक्या उत्पादनांसह सुरू झालेल्या सुदर्शनमध् आज ४०० ये पेक्षा जास्त उत्पादने निर्मिली जाताहेत. भारतासह जगभरातील बाजारपेठेत सर्वात मोठा रंगद्रव् (पिगमेंट) ये पुरवठादार म्हणून कंपनीची ओळख असून, ३५ टक्क्यांपेक्षा जास्त भाग सुदर्शनच्या नावाने आहे. गतवर्षीची वार्षिक उलाढाल २००० कोटी असून, पुढील तीन-चार वर्षात पाच हजार कोटी वार्षिक उलाढालीचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीपासूनच द्रष्टे नेतृत्व लाभत गेल्याने सुदर्शनची वाटचाल चढत्या क्रमाने राहिली आहे.

रोहा, महाड येथे विस्तीर्ण प्लांट

डॉ. आर. जे. राठी व ब्रदर्स यांच्या भरीव योगदानामुळे गेल्या ६९ वर्षात सुदर्शन एक महत्त्वाची कंपनी ठरली आहे. पेंट्स, प्लास्टिक, इंक, कोटींग, कॉस्मेटिक्स, फूड, पॅकेजिंग, रबर उद्योगातील पिगमेंट्स सुदर्शनच्या वतीने जगभर पुरवले जात आहेत. पावडर आणि पेस्ट प्रकारात ही पिगमेंट्स उपलब्ध आहेत. ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक प्रकारातील विविध रंगद्रवे उत्पादन आणि निर्यात केली जातात. जवळपास ८५ देशांत १७० चॅनेल पार्टनरच्या माध्यमातून कंपनीचे काम चालते. रायगड जिल्ह्यातील रोहा आणि महाड येथे उत्पादन निर्माण प्लांट आहेत. रोहा प्लांट १९७३ मध्ये सुरु झाला. ८० एकर जागेत हा प्लांट विस्तारलेला आहे, तर ३३ एकर जागेत विस्तारलेला महाड येथील प्लांट १९९३ मध्ये सुरु झाला. आज सुदर्शन परिवारात ३००० लोक विविध जबाबदाऱ्यावर काम करताहेत.

जगभर विस्तार

जागतिक मुख्य कार्यालय पुण्यात, तर पुण्याच्या आंबडवेट येथे सुदर्शनचे स्वतःचे संशोधन व विकास केंद्र आहे. युरोप, अमेरिका, मेक्सिको, ब्राझील, चीन, नेदरलँड यासह इतर अनेक देशांत सुदर्शनची कार्यालये आहेत. जगभरात सर्वत्रच सुदर्शनकडून या पिगमेंट्सची निर्यात केली जाते. तंत्रज्ञानाधारित उत्पादनाचा जागतिक दर्जा आणि उत्तम ग्राहक सेवा यामुळे सुदर्शनचे निर्विवाद वर्चस्व आहे. एवढेच नाही, तर रंगद्रव्ये उत्पादन करणाऱ्या पहिल्या चार कंपन्यांमध्ये सुदर्शनचा समावेश आहे. व्हायब्रंट आणि इनोव्हेटिव्ह संस्कृतीसह दर्जेदार उत्पादन उपलब्ध करण्याची परंपरा सुदर्शनने जपली आहे. सेवा, धैर्य, वचनबद्धता, आदर आणि विश्वास या मूल्यांवर आधारित कंपनीचे काम सुरु आहे. अध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण, सामाजिक दृष्टिकोनातून आणि पर्यावरणास शाश्वत राहून एकत्रित प्रगती साधण्याचा उद्देश ठेवून वाटचाल सुरू आहे.

‘कोरोना’च्या लढ्यात ‘सुदर्शन’ची साथ

सामाजिक बांधिलकी नेमकी कशी जपावी, याचं दर्शन गेल्या वर्षभरात ओढवलेल्या कोरोनाच्या संकट अधिक प्रभावीपणे घडलं. लॉकडाउनमुळे विस्कळीत जनजीवनला आधार देण्याचं, आरोग्यव्यवस्था बळकट करण्याचं काम सुदर्शननं केलं. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर वेळीच उपाययोजना करणारी आणि आपल्या कामगारांवर पुण्यातील अत्याधुनिक खासगी रुग्णालयात उपचार देणारी ‘सुदर्शन’ ही एकमेव कंपनी ठरली आहे.

शेअर मार्केटमध्ये ‘सुदयेर्शन’

ऑटोमोटिव्ह, प्लास्टिक, शाई, कोटींग, कापड आदी क्षेत्राला रंगद्रव्ये (पिगमेंट) पुरवणाऱ्या सुदर्शनने शेअर बाजारातही आपली छाप पडलेली आहे. सेन्सेक्स, निफ्टी या दोन्ही शेअर बाजारात सुदर्शनची कामगिरी समाधानकारक असून, देशाच्या अर्थव्यवस्च्थे या बळकटीकरण करण्यात योगदान दिले जात आहे.

जे. एम. राठी स्कूलची शिक्षण क्रांती

सुदर्शन केमिकल्स रोहा आणि महाड यथे स्थिरस्थावर झाल्यावर रोहावासीयांच्या मुलांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे, या उद्शाने दे १९७६ मध्ये जे. एम. राठी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केली. आज येथे २००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या अनेक वर्षपांसून दहावी व बारावीच्या १०० टक्के निकालाची परंपरा जे. एम. राठी इंग्लिश मीडियम स्कूलने जपली आहे. येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. जेएमआर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हजारो स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन रोहा व महाड प्लांटमध्ये नोकरी देण्यात आली आहे.

राजेश राठी

व्यवस्थापकीय संचालक, सुदर्शन केमिकल्

सेवा, धैर्य, वचनबद्धता, इच्छाशक्ती, आदर आणि विश्वास ही आमची मूल् आहेत आ ये णि त्याच मूल्यांवर सुदर्शन केमिकल्स गेली सात दशके काम करत आहे. भक्कम व व्यापक पायाभरणी हा आमचा प्रधान उद्दीष्ट व ध्येय आहे. आमचे सर्व सहयोगी स्तंभ, आमची मूल्य, तर त्याआधरे मिळणारे शाश्वत यश हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘सुदर्शन’ची हीच संस्कृती आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यास, औद्योगिक सहकार्यासाठी प्रोत्साहन देण्यासह नवोपक्रमांची अंमलबजावणी करण्यास उपयक्तु ठरते. नावीन्यपूर्ण आणि व्हायब्रन्ट संस्कृती जोपासत जागतिक दर्जाचा रंगद्रव्य पुरवठादार बनण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. ‘सुदर्शन’ परिवारात सहभागी झालेल्या व्यावसायिकांना इथे कामाचे एक चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. एकमेकांवरील विश्वास, सहकार्याची भावना, एकमेकांचा आदर हीच आमच्या टीमच्या यशाची ऊर्जा आहे.

आध्यात्मिकरीत्या परिपूर्ण, सामाजिक दृष्टिकोनातून आणि पर्यावरणास शाश्वत राहून एकत्रित प्रगती साधण्याचा उद्देश जपले आहे. औद्योगिक क्षेत्रात यश संपादन करत असतानाच सामाजिक बाधिं लकी म्हणून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सामाजिक बाधिं लकीच्या भावनेतून प्रत्येकाला आधार वाटेल, यासाठी सुदर्शन प्रयत्नशील असते. महिलांच्या सुरक्षेला आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिले जाते. कोरोनाच्या या कठीण काळातही आमचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसह रायगडवासीयांच्या आरोग्यासाठी आम्ही सतत पुढाकार घेतला आहे. शिक्षण क्षेत्रात जेएम राठी स्कूलची कामगिरी अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शाळेची वाटचाल सुरू आहे. देशाचा एक सक्षम नागरिक आणि माणूस घडविण्याचे केंद्र म्हणून जेएम राठी स्कूलचा नावलौकिक आहे. गुणवत्तेच्या बाबतीत शाळेने अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. शाळेत शिकून गेलेले विद्यार्थी आज विविध महत्त्वाच्या पदांवर असून, मत्री, अधिकारी, उद्योजक, कलाकार म्हणून उल्लेखनीय काम करताहेत, ही शाळेसाठी गौरवाची गोष्ट आहे.

शिवालिका पाटील

प्रमुख, मनुष्यबळ व्यवस्थापन

‘सीएसआर’च्या माध्यमातून सुदर्शन केमिकल्स समाजात महत्त्वाचे योगदान देत आहे. महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या चार महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. रोहा, महाड येथील उत्पादन केद्रे, सुतारवाडी येथील संशोधन व विकास केंद्र आणि पुण्यातील मुख्य कार्यालयाच्या अवतीभवती असलेली गावे आणि झोपडपट्ट्यांमध्ये ‘सुदर्शन’ या चारही विषयांसंदर्भात कार्यरत आहे. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आम्ही २० गावामंधील दहा हजार कुटुंबे आणि ३८,६२६ लाभार्थ्यांच्या जीवनात बदल घडवू शकलो. महिला सबलीकरणासाठीच्या काही प्रकल्पांतून सुमारे ३००० महिला सक्षम बनल्या आहेत. त्या आता दरमहा दोन ते तीन हजार रुपये कमवताहेत. आदर्श गाव योजना प्रकल्पाच्या माध्यमातून १५ गावामध्ये सुधारणा घडवून आणल्या आणि त्यातल्या दोन ग्रामपंचायतींना ‘आयएसओ’ प्रमाणित होण्यास सहकार्य केले.

शैक्षणिक प्रकल्पांचे ध्येय शाळांना ‘आयएसओ’ प्रमाणित करणे आहे, जेणेकरून शिक्षणासाठीच्या सर्व प्रयत्नांमध्ये शाश्वतता निर्माण होईल. गेल्या काही वर्षांत आम्हाला राष्रीयट् व आंतरराष्रीयट् स्तरावरच्या विविध संस्थांनी १५ विविध पुरस्कारांनी गौरवले आहे. कोरोनाकाळात महाराष्ट्र शासनाला दहा व्हटिें लेटर्सदिले. रोहा येथील रुग्णालयाला दोन मिनी व्हटिें लेटर दिले. तसेच लॉकडाउनकाळात ५००० पेक्षा अधिक गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले. शहरी आणि ग्रामीण रुग्णालयांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे दान केली. ग्रामीण भागातल्या १५० महिलांना मास्क शिवण्याचे प्रशिक्षण दिले. या महिलांनी आतापर्यंत तीन लाखांहून अधिक स्वनिर्मित मास्कची विक्री केली आहे. आपल्या आसपासच्या समाज समूहांची सेवा करण्याची ऊर्मी हीच व्यापक उद्दिष्टाप्रती समर्पित कार्य करण्यासाठी आम्हाला सदैव तत्पर ठेवते. ‘सीएसआर’ हा एक प्रवास आहे आणि या प्रवासात आमच्याकडून सर्वोत्तम कार्य होत राहील, असा आम्हाला विश्वास आहे.

उद्योग सेवेसह सामाजिक कार्यांतही अग्रेसर

प्रमुख, मनुष्यबळ व्यवस्थापन

जगभरात दर्जेदार पिगमेंट उत्पादन पुरवठादार अशी ख्याती मिळवलेली सुदर्शन केमिकल्स सामाजिक कार्यांतही अग्रेसर आहे. शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास साधण्यासाठी सुदर्शन कायमच पुढे राहते. आजवर लाखो झाडांची लागवड, संगोपन करण्यासह कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण यावर भर दिला आहे. सुदर्शन केमिकल्स रोहा आणि महाड येथे स्थिरस्थावर झाल्यावर रोहावासीयांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने १९७६ मध्ये जे. एम. राठी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केली. आज येथे २००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दहावी व बारावीच्या १०० टक्के निकालाची परंपरा जे. एम. राठी इंग्लिश मीडियम स्कूलने जपली आहे. येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो.

ग्रामीण भागातील मुलांना शाळेत जाण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी सुदर्शनच्या वतीने सायकलींचे वाटप करण्यात आले.

जेएमआर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हजारो स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन रोहा व महाड प्लांटमध्ये नोकरी देण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक गावात ग्राम बैठका, प्रशिक्षण व विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बहुउद्देशीय सामाजिक केंद्र उभारण्यात आली आहेत. स्वयंरोजगार उपक्रमातून शिवणकाम प्रशिक्षण व शिलाई मशिन, कागदी पिशवी बनविण्यासाठी साहित्य आणि प्रशिक्षण दिले जाते. पावसाळ्यात स्थानिक लोकांच्या सोयीसाठी बस स्टॉप, निवारा आदी सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम, सुरक्षा उपकरणांची प्रदर्शने नियमितपणे आयोजिली जातात. सुदर्शनने सीएसआर अंतर्गत आदर्श गाव प्रकल्प हाती घेतला असून, १३ गावांत तो राबवला आहे. त्यातील तीन गावांना राज्य सरकारकडून संत गाडगेबाबा निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे. रायगडमधील रोहा, महाड आणि मुळशीतील सुतारवाडी येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात पाच हजार कुटुंबं जोडलेली आहेत. महिला सक्षमीकरण अंतर्गत सात वर्षांपासून कागदी पिशवी बनवण्याचे काम होत असून, ३०० महिला यावर काम करीत आहेत. सात राज्यात या पिशव्यांचा पुरवठा करण्यात येतो. आजवर चार कोटी कागदी पिशव्यांची निर्मिती केली आहे. प्लास्टिक पिशवीला पर्याय असलेल्या कागदी पिशवी बनविण्यासाठी कच्चा माल व प्रशिक्षण सुदर्शन केमिकल्स देते. २०० महिलांना शिवणकाम प्रशिक्षण दिले. या महिला पुण्यात विविध ठिकाणी स्वतंत्र व्यवसाय करत आहेत. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळांना आयएसओ नामांकन मिळाले आहे. तरुणांसाठी कौशल्य विकास अंतर्गत एलईडी दिवे बनविण्याचे केंद्र उभारले आहे. त्यालाही आयएसओ नामांकन आहे. आदिवासी कुटुंबांकरिता संगीत केंद्र, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय सुरू केले आहेत. शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी गावांमध्ये ॲक्वा प्लांट, विहीर बांधकाम यासह गाव, शाळांमध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे.

कोरोनातील कामांची ठळक वैशिष्ट्ये

  • कामगार, कुटुंबीय, परप्रांतीय मजूर, तसेच महाड, रोहा, श्रीवर्धन आणि पुण्यातील पाच हजारांहून अधिक कु टुंबांना एक महिन्याचे धान्य, जीवनावश्यक वस्तूसंच
  • मास्क, सॅनिटायझर आणि कॅन्टीनची सुविधा उपलब्ध केल
  • स्थलांतरित मजुरांना निवारा-जेवण उपलब्ध केल
  • आदिवासी कु टुंबांच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांच्यापशुपालनासाठी साहाय्य
  • राज्य सरकारला १० व्हेेंटिलेटर्स भेट
  • स्थानिक सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, सीरिंज पंप आणि ब्लड मॉनिटरिंग सिस्टिम व इतर वैद्यकीय उपकरणे, औषध
  • बचत गटातील १०० हून अधिक महिलांना एक लाख कापडी मास्क तयार करण्याचे काम
  • आरोग्य विभाग, पोलिस विभाग, आशाताई आणि ग्रामीण आरोग्य केंद्रात मास्कवाटप
  • आरोग्य स्वच्छतेसह कोरोनापासून बचावासाठी मार्गदर्शन, गुणवत्ता प्रशिक्षण
  • रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण केंद्रात रोज निर्जंतुकीकरण, सुरक्षारक्षक, जेवणाची व्यवस
  • पूर्णवेळ ‘कोविड मेडिकल टास्क फोर्स’ची निर्मिती
  • कं पनीच्या परिसरात कामगार व त्यांच्या नातलगांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची उभारणी
  • जनजागृतीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे इंग्रजी आणि मराठीतून लाइव्ह वेबिनार

‘सुदर्शन’च्या जडणघडणीतील महत्त्वाचे टपे

  • १९५२ : पिगमेंट निर्मिती क्षेत्रात सुदर्शन केमिकल्सचे पाऊल
  • १९७४ : रोहा येथे प्लांट सुरू. एमआयडीसीतील पहिली कंपनी
  • १९७६ : पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून नावारूपाला
  • १९८७ : रोहा प्लांटमध्ये अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर
  • १९८९ : वर्ल्ड लीडर असलेल्या जपानच्या डीआयसीशी भागीदार
  • १९९३ : आयएसओ ९००१ प्रमाणपत्र मिळविणारी पहिली भारतीय केमिकल कंपनी
  • १९९४ : महाड येथील प्लांटमध्ये उत्पादन सुरु
  • २००० : ईआरपी (सॅप) प्रणाली स्वीकारणारी पहिली भारतीय कंपनी
  • २००१ : आयएसओ १४००१ प्रमाणपत्र प्राप
  • २००३ : सीआरएस राबवणारी आशियातील पहिली कंपनी
  • २००७ : जागतिक धोरणांचा अवलंब, युरोपियन सबसीडायरी, संशोधन व विकास केंद्र निर्मिती
  • २००९ : पिगमेंट विभागात एसबीईएमची सुरुवात, उत्तर अमेरिका सबसीडायरी, ईटीएडी सभासदत्वाने गौरव
  • २०१० : ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलकडून फोर स्टार रेटिंग
  • २०१२ : ब्रिटिश सेफ्टी काैन्सिलचे महत्त्वपूर्ण ५ स्टार रेटिंग अवॉर्ड रोहा व महाड कं पनीस मिळाले.
  • २०१४ : नेटवर्किं ग कॅ पिटल, प्राॅडक्टिव्हिटी सुधारणा प्रोजेक्ट
  • २०१५ : महाड कारखान्यात प्राॅफिटॅबिलिटी प्रोजेक्ट्स
  • २०१६ : संशोधन प्रयोगशाळेत न्यूप्राॅडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस सुधारणा
  • २०१७ : रेनाॅयर कन्ससल्टीगसमवेत काॅस्ट रिडक्शन प्रोजेक्ट रोहा व महाड फॅक्टरीत सुर
  • २०१८ : लिप प्रोजेक्ट
  • २०२० : सॅप हना (SAP HANA) प्रकल्प

ठळक वैशिष्य

  • संशोधन व विकास, तंत्रज्ञान, इनोव्हेशन यावर दरवर्षी चार दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक
  • तीन प्रयोगशाळांत जवळपास १०० तंत्रज्ञ कार्यरत
  • पर्यावरण संवर्धन क्षेत्रावर दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक
  • सर्व प्लांट आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त (आयएसओ ९००१-२०१५, आयएसओ १४००१-२०१५, आयएसओ ४५००१-२०१८)

‘सुदर्शन’ला मिळालेले पुरस्कार

  • सामाजिक कार्यासाठी (सीएसआर) ‘महात्मा अवार्ड २०२०’
  • मेरिटोरियस परफाॅर्मन्स इन इंडस्ट्रीयल सेफ्टी अवाॅर्ड (२००९)
  • वर्ल्ड एचआरडी काँग्रेस (२०१३) फन अट वर्क
  • फिक्की सेफ्टी एक्सलन्स अवाॅर्ड (२०११)
  • प्रदषूण नियंत्रणासाठी दरवर्षी सन्मानित
  • सीएसआरसाठी गोल्डन पीकाॅक अवाॅर्ड (२०१६)
  • वर्ल्ड एचआरडी काँग्रेस (२०१७) ड्रीम कं पनी फाॅर वर्क
  • कामगार मंत्रालय, भारत सरकारतर्फे नॅशनल सेफ्टी अवार्ड
  • नॅशनल सेफ्टी कौन्सिलतर्फे सेवा श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार
  • केमटक फउंडेशनचा पुरस्कार
  • ग्लोबल वेस्टमेट पुरस्कार
  • लंडन येथे स्वोर्ड ऑफ ऑनर हा बहुमा
  • ग्लोबल सीएसआर एक्सलन्स अवार्ड
  • ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ सलग चार वर्षे
  • सीआयआय एचआर अवार्ड

सुदर्शन केमिकल्सच्या वतीने आरोग्य केंद्रास वॉशिंग मशिन भेट देण्यात आले.

मराठी