आमचा घाटगे परिवार तसा शिक्षण क्षेत्राला यशोलौकिकाचे शिलेदार देणारा. (कै.) वसंतराव यांचे एक भाऊ पद्मश्री डॉ. विष्णुपंत हे भारतातील ‘एरोनॉटिक्स’ या ज्ञानशाखेचे म्हणजेच विमान उद्योगाचे पितामह. दुसरे बंधू सखारामपंत शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीत योगदान देणारे, तिसरे बंधू प्रा. डॉ. अमृतराव हे संस्कृत, पाली, प्राकृत या प्राचीन भाषांचे तज्ज्ञ व मराठी-संस्कृत कोशाचे जनक. (कै.) वसंतराव हेसुद्धा वनस्पतीशास्त्र विषय घऊन एम.एससी. झाले आणि राजाराम कॉलजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले; पण तीन वर्षांनी आरोग्याच्या तक्रारीमुळे त्यांना दीर्घकाळ रजा घ्यावी लागली आणि नोकरी सुटली. त्यानंतर मित्र जयकुमार पाटील यांच्याबरोबरीने दोन ट्रॅकचा बळावर मालवाहतूक व्यवसायास प्रारंभ केला आणि कोल्हापूरच्या उद्योगविश्वात वेगळा ठसा उमटवला.
विश्वास आणि ग्राहकाभिमुख सेवेचा सर्वोत्तम ब्रॅंड : घाटगे ग्रुप, कोल्हापूर
महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि विकासाचे नवे पर्व सुरू झाले. महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर नेण्यासाठी अनेकांनी कंबर कसली. अनेकांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्राची भक्कम जडणघडण झाली. महाराष्ट्राच्या या एकूणच जडणघडणीमध्ये कोल्हापुरातील घाटगे ग्रुपने मोठे योगदान दिले आहे. उद्योग, व्यवसायाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमातही हा ग्रुप नेहमी आघाडीवर राहिला आहे. ‘कधीही स्वार्थीपणा करू नका, पैसाच सर्वस्व मानू नका, माणुसकी जपा, बळकट कुटुंबव्यवस्था हीच खरी ताकद’ ही चतुःसूत्री या ग्रुपने जपत आपल्या व्यवसायाचा जगभरात खणखणीत ब्रॅंड बनविला.
घाटगे ग्रुप : अनेक कुटुंबांचा आधारवड
मोहन घाटगे, चेअरमन, घाटगे ग्रुप
दुसऱ्या महायुद्धाचा काळ आणि सरकारचे उद्योगाला पूरक धोरण नसतानाही जिद्दीन (कै.) वसंतराव घाटगे यांनी ‘घाटगे-पाटील’ या कंपनीला देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनवल. कंपनीच्या माध्यमातून त्या काळात तीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता. त्यांनी उद्योगातही अनेक वैविध्यपूर्ण प्रयोग केल. कोल्हापुरात बर्फमिळत नसल्याने बर्फ बनविण्याचा कारखानाही सुरू केला. इतकेच नव्, तर हे चित्रपटांची हौस असल्यामुळे ‘टुरिंग टॉकीज’ची निर्मिती करून लोकांना चित्रपटही दाखवले. घाटग-पाटील इंडस्टरी्जची अधिकृत नोंदणी 4 नोव्हेंबर 1945 रोजी झाली; पण तत्पूर्वी तीन त चार वर्षे आधीपासून मालवाहतुकीला प्रारंभ झाला होता. पुढे 1958 मध्ये ‘घाटग-पाटील (ट्रान्स्पोर्ट) कंपनी प्रायव्हेट लिमिटेड’ झाली. त्यावेळी केवळ अकरा ट्रक होते. पुढे 1971 मध्ये ट्रकची संख्या 190 वर गेली. त्यातीळ 45 ट्रक म्हणजे पार्सल नेणाऱ्या ‘क्लोज्ड व्हॅन होत्या. कंपनीच्या एकूण व्यवसायातील पार्सलचे प्रमाण जवळजवळ नव्वद टक्के होते. दरम्यानच्या काळात कंपनीने विविध व्यवसायांत यशाचे एकेक टप्पे पार केले. एम्बसडर मोटारी, बडेफोर्ड ट्रक, दोघांचे स्प्रेअर पार्टस्, जीप आणि जीपचे स्पेअर पार्टस्, लॅंब्रेटा स्कुटर आणि तिचे स्पेअर पार्टस्, कमिन्स इंजिन्स, पर्किन्स इंजिन्स, कमानी रोड रोलर्स, एक्साईड बॅटरीज, लुकासजी लाईट फिटिंग्ज, फायरस्टोन, गुडीयर, डनलॉप, मॅन्सफिल्ड, एमआरएफ आणि इंडिया सुपर या सर्व कंपन्यांच टायर, एबीसी बेअरिग्ज, कॅनरा स्प्रिंग्ज आणि या सर्व उत्पादनांच स्पेअर पार्टस् यांची वितरण एजन्सी कंपनीकडेहोती. एकूणच हा सारा विस्तार वाढत गेला. मात्र, एका विशिष्ट टप्प्यावर घाटग आणि पाटील या दोन कुटुंबांनी सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घतला. यानंतर घाटगे परिवाराकडे ट्रान्स्पोर्ट, ट्वरॅ्हलसंबंधी सर्व व्यवसाय आला. त्यानंतरही अनेक अडचणींवर मात करत ‘घाटगे ग्रुप’ पुढे यशाची एकेक शिखरे पार करत ग्राहकांबरोबरच अनेक कुटुंबांचा आधारवड ठरला.
अनेक आव्हानांवर केली मात
सतीश घाटगे, व्यवस्थापकीय संचालक, घाटगे ग्रुप
घाटगे आणि पाटील परिवारामध्ये कंपनीची विभागणी झाल्यानंतरचा काळ तसा अनेक आव्हानांचा होता आणि तो कुशल मनुष्यबळासह आथिर्क आव्हानाचाही होता; पण आम्ही नेटाने कामाला लागलो होतो. सर्वात पहिल्यांदा नेटवर्क अधिक भक्कम करण्यावर भर दिला. दोन महिने अगदी दिल्लीपासून ते केरळपर्यंत कंपनीशी संबंधित सर्व घटकांना भेटून त्याचाशी संपर्क आणि संवादही वाढवला. केवळ एकदा भटून पुरे व्हायचे नाही, तर त्यात सातत्य ठेवाव लागले. दोन स्वतंत्र कंपन्या झाल्याने कुशल मनुष्यबळाचीही विभागणी झाली. त्यामुळे अनुभवी, चांगली माणसं मिळवण आणि टिकवणही आव्हानच होते; पण आम्ही त्यातही यशस्वी होत गलो.
1994 मध्ये ‘तेज कुरिअर ’ची स्थापना झाली आणि त्याचाही विस्तार होत गेला. 1999 ला ‘हडाई’ची डीलशिप मिळाली. पुढे टाटा, टीव्हीस अशा डीलरशिप मिळत गले्या; पण त्यासाठी आम्हाला स्वतःहून अधिक कुठल्या कंपनीकडे जावे लागले नाही. कारण जिद्दीच्या जोरावर आमची सारी टीम या क्षेत्रात इमानेइतबारे आपली सारी शक्ती पणाला लावून काम करीत होती. घाटगे ग्रुप हा ब्रँड त्यामुळे देशभर पोहचू लागला होता. साहजिकच कंपन्यांनी आम्हाला बोलावून डीलरशिप दिल्या; मात्र या कंपन्यांच्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. विश्वास आणि ग्राहकाभिमुख सेवेच्या बळावरच ग्रुपचा विस्तार झाला. ‘घाटगे लॉजिस्टिक कंपनी’ स्थापन झाली. मुळात कुठलाही व्यवसाय असो किंवा उद्योग; त्यामध्ये एका गोष्टीला नक्कीच प्राधान्य दिले गेले पाहिजे. आपण कितीही मोठ इेन्फ्रास्ट्रक्चर उभे करू शकतो, शंभर गाड्या खरेदी करू शकतो; पण शंभर चांगल ड्रायव्हर मिळवणे आणि तेटिकवणेही गोष्ट फार महत्त्वाची असत. घाटगे परिवारातील प्रत्येक सदस्य त्याबाबत नेहमीच आग्रही राहिला आहे. गले्या दोन वर्षांचा काळ नक्कीच कठीण होता. भविष्यात काय होईल हे अद्यापही सांगता येत नाही; मात या कठीण परिस्थितीतही पाय घट्ट रोवून व्यवसायात उभं राहणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यातही आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. कारण आमची पुढची पिढी आता व्यवसायात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आहे. त्यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे. विविध आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करण्याचा त्यांचा ध्यास आम्हालाही नक्कीच प्रेरणा देणारा आहे. बदलत्या काळाबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर ही मंडळी तितक्याच प्रभावीपणे व्यवसायात आणत आहेत. ही मंडळी घाटगे ग्रुप परिवारातील प्रत्येक घटकाचीही तितक्याच आत्मियतेने काळजी घेत आहेत. त्यांच्यासाठी शिक्षणाबरोबरच
विविध योजनाही ग्रुपमध्ये सुरू झाल्या आहेत.
तेज कुरियर देशभरात न्यायचेय
साधना घाटगे, व्यवस्थापकीय संचालक, तेज कुरिय
मुळातच घाटगे परिवारातील प्रत्येक सदस्य आधुनिक विचारसरणीचा. विवाहापूर्वी मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला. नामांकित हॉटेलात कामही केलेले . हा सारा अनुभव पाठीशी होता. घाटगेंची सून म्हणून कोल्हापुरात आल्यानंतर सासर (कै.) वसंतराव घाटगे यांचे सातत्याने प्रोत्साहन मिळाले. ‘सायबर’मध्ये ‘एमबीए’ केले. प्रारंभी राजारामपुरीत बुटीकही सुरू केले; पण त्यावेळी ही संकल्पना कोल्हापुरात एकदमच नवखी होती. काही काळानंतर बुटीक बंद केल आणि घाटगे ग्रुपमध्ये लक्ष घातले. 1994 मध्ये कुरियर क्षेत्रात अनेक संधी असल्याचे लक्षात आल्याने ‘तेज कुरियर’ची स्थापना केली. पुढे या व्यवसायाचा विस्तारही होता गेला. कुठली ही डिलिव्हरी 24 त 48 तासांत झालीचे पाहिजे, हा तेज कुरियरचा नियम आहे. त्यामुळेच ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आला. डॉक्युमेंट डिलिव्हरीचा बिझनस कमी झाला असला तरी आम्ही सध्या फार्मामध्ये अधिक काम करतो.
वॅक्सिन डिलिव्हरीसाठी तेज कुरियरचा पर्याय ग्राहक आणि कंपन्यांना सर्वोत्तम वाटतो. व्यवसायातील सर्वाधिक शेअर फार्माचाच आहे. खडोपाडी आम्ही नटवेर्क उभे केले आहे आणि फ्रॅंचाईजींचे जाळेही निर्माण केले आहे. गले्या काही वर्षांत आम्ही आंब्याचीही डिलिव्हरी करतो आणि त्यालाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. एकूणच व्यवसायात आमचा कस्टमर केअर विभागही महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. देशभरात तेज कुरियरचे जाळे असले पाहिजे, हे एक स्वप्न आहे. त्यासाठीचा कृती आराखडाही तयार आहे. पण, लॉकडाउनमुळे सध्या आहे त्याच व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. हा कठीण काळ जाताच देशात कुठेही गेलात तरी नक्कीच तेज कुरियरचे नाव झळकलेले दिसेल. सध्या पस्तीस कार्यालये, साडतीनशे हून अधिक फ्रॅंचाईजी आणि शंभरहून अधिक एजंट असा या व्यवसायाचा विस्तार आहे. व्यवसायाबरोबरच सामाजिक कामाची आवड आहे. म्हणूनच विविध संस्थांच्या माध्यमातून सतत समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न असतो. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून मतिमंद मुलांसाठी आम्ही काम करतो. या मुलांसाठी वसतिगृह सुरू केले होते. ‘रोटरी’च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांवर भर दिला. ‘रोटरी गार्गीज’च्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम राबवले. आजवरच्या कामासाठी अनेक पुरस्कारही मिळाले; पण त्याबरोबरच या कामात मिळणार समाधान मोठे आहे.
ग्राहकाभिमुख सेवेचे समाधान
तेज घाटगे, व्यवस्थापकीय संचालक, मोहन ऑटो इंडस्ट्रीज प्रा. लि.
उद्योगविश्वात घाटगे परिवाराची गौरवशाली परंपरा मोठी. हीच परंपरा खमकेपणानं पुढ नेताना दोन दशकापूर्वी ‘माई हडाई’ची स्थापना केली. पाहता-पाहता हा परिवार इतका मोठा झाला, की सध्या साठ हजारांवर ग्राहक आमच्याशी कायमच जोडल गेले आहेत. आम्ही देत असलेल्या ग्राहकाभिमुख सेवेचंच हे प्रतीक असून, त्याचेनिश्चित समाधान आहे. 1998 मध्ये स्थापना झाली तेव्हा कंपनीने ‘सॅंट्रो’ लॉंच केलली. मुळात कंपनी कोरियन. मात्र, एक वेगळी संकल्पाना त्यांनी पुढे आणली आणि त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एकेक मॉडल बाजारात आले आणि पुढे पाहता-पाहता कंपनी देशातील दोन नंबरची बनली.
मुंबईपेक्षाही अगोदर कोल्हापुरात आम्हाला डिलरशिप मिळाली आणि आता कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तासगाव, इस्लामपूर, कुडाळ, चिपळूण, जयसिंगपूर, इचलकरंजी या ठिकाणी सले्स आणि सर्व्स पॉइंट्हिस आहेत. ‘माई हडाई़’ची अकरा तर चेतन मोटोर्सची पाच आउटलेट आहेत लॉकडाऊनपूर्वीचा विचार केला तर पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांची साथ आणि महिन्याला साडेतीनशे ते चारशेवर डिलिव्हरी असल्याचा अभिमान नक्कीच वाटतो. ‘हुअँडए’नं मात्र आतापासूनच भविष्यवेधी भूमिका घेत संशोधनावर भर दिला आहे. जो सर्वोत्तम ग्राहकसेवा देईल, तोच मात्र या क्षेत्रात टिकणार आहे आणि जे करायचं तसे र्वोत्तमच हा ध्यास घाटगे परिवारानं अगदी पहिल्या दिवसापासून जपला आहे. आजवर राष्ट्रीय पातळीवरील परिषदांत अनेक पुरसाकार मिळाले. कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम प्रशिक्षण दणे्यावर भर राहिला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
आमच्याकडे चालक बनतो मालक
तुषार घाटगे, व्यवस्थापकीय संचालक, घाटगे-पाटील ट्रान्स्पोर्ट प्रा. लि.
घाटगे पाटील ट्रान्स्पोर्टला आठ दशकांची मोठी परंपरा आहे. त्याची धुरा मी २०१० साली अधिकृतपणे घेतली असली तरी तत्पूर्वी तीन वर्पे विविध विभागात काम केल.प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती जाणून घतली. कुठल्या विभागात नेमके कोणत प्रश्न आहेत. तेथे आणखी काय नवीन करता येईल इथपासून ते नव्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, अशा विविध अंगांनी अभ्यास करण्याची माझ्यासाठी ही एक कार्यशाळाच होती. त्यामुळ अे धिकृतपणे जबाबदारी घेतल्यानंतर विविध बदलांवर अधिक भर दिला. व्यवसायात आधुनिकता आणली. ‘आयटी़’ विभाग सुरू झाला. हळूहळू सर्वच गोष्टी कॉम्प्युटर आणि आता तर मोबाईलर आल्या आहेत.
त्यामुळे सतत व्यसायात नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. त्यासाठी स्वतंत्र आठ त दे हा लोकांची टीम कार्यरत आहे. एखादा माल घेवून गलेली गाडी सध्या कुठे आहे. तिची प्रवासाची गती किती आहे इथपासून ते ड्रायवरची सुरक्षितता या साऱ्या गोष्टी आता तुम्ही कुठे असाल तिथे मोबाईलवर मिळू शकते. प्यूएल टॅंकरमध्ये आता आम्ही आहे. त्यातील विविध कंपन्यांबरोबर काम करण्याचेनिकषच अवघड असले तरी ते सुध्या आम्ही सोपे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झालो. नव्या आणि जुन्याचा संगम साधत व्यवसायाचा विस्तार होत असला तरी ड्रायव्हरची जिंदगी सर्वात कठीण असल्याची जाणिव आम्हाला प्रत्येकाला आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता आमच्यासाठी अधिक महत्वाची आहे. ड्रायव्हरही गाडीचा मालक झाला पाहिजे, या भावनतून आम्ही एक योजना सुरू केली आणि त्याचा लाभ सुमारे पंचवीसहून अधिक जणांनी आजवर घेतला आहे. ही मंडळी गाडीचे मालक झाली. पण, ग्रुपशी त्याची नाळ कधीच तुटली नाही.
सवोत्तमाचा ध्यास घेउनच वाटचाल
गौरव घाटगे, व्यवस्थापकीय संचालक, घाटगे ट्रकिंग
जे काही करायचं ते सवोत्तमच, हा ध्यास घाटगे परिवाराने नेहमीच जपला आहे. घाटगे लॉजिस्टीकचा माध्यमातून पुण्यात व्यवसायाला सुरवात केली होती. पुण्यात इंजीनीअरींग इंडस्टरी् मोठी आहे. हा व्यवसाय सुरू असतानाच 2011 मध्ये पुण्यात भारत बेंझच्या डिलरशीपच्या निमित्ताने संधी मिळाली आणि पूर्णवेळ पुण्यातील व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आली. सप्टेंबर 2012 मध्ये पुण्यातील पहिल शोरूम सुरु झाल. मे हाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांसाठी डिलरशीप मिळाली. प्रारंभीची दोन वर्षे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढवण्यावर अधिक भर द्यावा लागला. अनेक आव्हानेहोती. पण, त्यावर मात करत व्यवसायाचा विस्तार वाढत गेला. सध्या भारतातील पहिल्या चार सर्वोत्कृष्ट वितरकांमध्ये घाटगे ग्रुपचा समावेश आहे. पश्चिम विभागाचा विचार केल्यास आम्ही अव्वल आहोत.
पुण्यात दोन ठिकाणी, नाशिक, बारामती, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा आदी अकरा लोकेशन्सवर हा व्यवसाय असून येत्या दोन त तीन वर्षात किमान वीस लोकेशन्सवर व्यवसायाचा विस्तार करावयाचा आहे. ग्राहकाभिमुख सेवा आणि विश्वास या बळावरच आजवरचा व्यवसायाचा विस्तार झाला. त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत आमची ही वाटचाल सुरू राहिली आहे.
सन्मान आणि पारितोषिक
प्रतिष्ठेच बे स्ट े बिझनस एक े ्सलन्स ॲवार्ड स्वीकारताना तेज घाटग.
घाटगे ग्रुपचा विस्तार..
- घाटगे-पाटील ट्रान्स्पोर्ट प्रा. लि.
- घाटगे लॉजिस्टिक प्रा. लि.
- घाटगे-पाटील कन्सल्टन्सी प्रा. लि
- घाटगे-पाटील इंडस्ट्रीयल ट्रकिंग
- माई हुंडाई
- माय टीव्हीएस
- चेतन मोटर्स
- मोहन ट्रॅव्हल
- तेज कुरियर
- केजीपी ॲटो लिमिटेड
- तुषार एं टरप्रायझेस
सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम
घाटगे ग्रुप आणि सामाजिक बांधिलकी हे एक अतटू समीकरणच. वृक्षारोपणाबरोबरच (कै.) वसंतराव घाटगे मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील गरजूंसाठी ग्रुपने नेहमीच पुढाकार घेतला आहे. दोन वर्षापूर्वी महापुराने हाहाकार माजवला आणि त्यानंतर पूरग्रस्तांसाठी या ग्रुपने पुढाकार घेतला. दोन वर्षतां कोरोनाचा कहर असताना लॉकडाउनच्या काळात बंदोबस्तावरील पोलिसांसाठी रोज न चकुता जवेण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रुपतर्फे केली जात आहे. गेल्या वर्षीपासून ग्रुपच्यावतीने कोल्हापुरातील टाकाळा परिसरात ‘मानवसेवा कोविड सेंटर’ सुरू केले आहे. त्याचा सर्व खर्च ग्रुप करत आहे. तेथे सध्या वीस बेड उपलब्ध आहेत. आणखी वीस बेडची सुविधा आवश्यकतेनसार केली जाणार आहे. सात डॉक्टर व 24 वैद्यकीय कर्मचारी सध्या तेथे कार्यरत आहेत.
48 सीसीची 'लक्ष्मी'
‘लक्ष्मी’ नावाची ही स्कू टरेट श्रेणीतली गाडी कोल्हापुरात 1972 पासून तयार व्हायला लागली. या गाडीचे मूळ तंत्रज्ञान जरी ‘इनोसेंटी’ या मूळच्या इटालियन कंपनीकडून आयात के लेले असले, तरी याची निर्मिती कोल्हापूरच्या घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये झाली आहे. 1970 च्या आसपास एका राष्ट्रीय पातळीवरील परिषदेत वसंतराव घाटगेंना या प्रकारचे तंत्रज्ञान API नावाच्या एका भारतीय कंपनीकडे असल्याचे समजले. वसंतराव घाटगेंनी ते तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी ताबडतोब हालचाल सुरू के ली. त्याचवेळेस त्यांनी किर्लोस्कर समूहाशी करार करून किर्लोस्कर-घाटगे पाटील ऑटो लिमिटेड कं पनी स्थापन के ली. ही कंपनी उचगावमध्ये होती. या गाडीचे इंजिन किर्लोस्करकडून आणि बॉडी ओगले समूहाकडून बनवली जाणार होती. हे सगळे पार्ट जोडून गाडी तयार करणे आणि तिच्या मार्केटिंगची जबाबदारी घाटगे-पाटील समूहाची असणार होती. ‘लक्ष्मी’ 1972 पासून धावू लागली. शेतकरी, दग्ध व्यवसायिकांच्या पसंतीला तर ही गाडी उतरलीच; पण शहरी भागातही लोकप्रिय झाली. ही गाडी 48 सीसीची होती. चाके मोठी असल्यामुळे कच्च्या रस्त्यावरही ती उत्तम चालत असे. गाडीचे वजन आणि किं मतही कमी होती. ‘लक्ष्मी’ दणकटपणात मोटारसायकलच्या जवळपास जाणारी होती. 1975 पर्यंत जवळपास वर्षाला 2400 गाड्यांचे उत्पादन होऊ लागले. संपूर्ण देशातून या गाडीला मागणी येऊ लागली. आजच्या बुलेट क्लबसारखे त्या काळात चेन्नई, बंगळुरूमध्ये लक्ष्मी गाडी चालवणाऱ्यांचे क्लब होते.
तिसऱ्या पिढीबरोबर कामाची संधी
दिग्विजय राजेभोसल, संचालक, माई ह्युंडाई
मी या क्षेत्रात 1980 च्या सुमारास आलो, तेव्हा घाटगे ग्रुपचा दबदबा होता. योगायोगाने मी जॉईन झालो आणि आजअखेर 33 वर्षे या ग्रुपच्या तिसऱ्या पिढीसोबत काम करत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये वसंतराव घाटगेसाहेब यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यानंतर सतीश घाटगेसाहेब यांच्याबरोबर काम केले. किंबहुना त्यांनीच मला घडवले असे म्हणणे जास्त उचित होईल. वेगवेगळ्या प्रसंगांतून त्यांच्या अनुभवसमृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून बरेच काही शिकायला मिळाले. कर्मचाऱ्यांशी सौहार्द साधत व्यावसायिक कौशल्ये वाढवण्यासाठी ते सतत प्रोत्साहन देत असतात. तेज घाटगेसाहेब यांच्या रूपाने नवे जोशपूर्ण धडाडीचे नेतृत्व आम्हाला लाभले असून, त्यांच्या गतिशील आणि उत्साही कार्यपद्धतीच्या जोरावर यशस्वी वाटचाल सुरू आहे. नऊ मेहा दिवस आम्हा घाटगे ग्रुपच्या सदस्यांसाठी खूप ऊर्जा प्रदान करणारा असून, वर्षभर आम्हाला हा दिवस नवी उमेद देत राहतो.